गुन्हेगारी

अहिल्यानगर शहरात अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणा-या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या! एक लाख सतरा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त! स्थानिक गुन्हे शाखेचा दणका!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 18 फेब्रुवारी: अहिल्यानगर शहरात अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणा-या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की,
मा. श्री सोमनाथ घार्गे , पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैधरित्या गॅस टाक्यामधुन रिफीलिंग करणारे ठिकाणांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. श्री किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/अनंत सालगुडे पोलीस अंमलदार सुनिल पवार, शाहीद शेख, गणेश धोत्रे यांचे पथक तयार करुन सदर पथकास अहिल्यानगर शहरामध्ये माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
वर नमुद स्थागुशा पथकाने दिनांक 16/02/2026 रोजी अहिल्यानगर शहरामध्ये पेट्रोलींग करत असतांना पथकास अहिल्यानगर शहरातील जुनी महानगरपालीका जवळील बेग पटांगण हौसिंग हॉस्पिटलच्या समोरील शेडच्या आडोशाला घरगुती गॅस टाक्यामधुन वाहनामध्ये रिफिलिंग करित असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री केली असता, सदर ठिकाणी एक इसम गॅस टाक्यामधुन चारचाकी वाहनामध्ये गॅस रिफिलिंग करत असतांना दिसुन आला. त्याला ताब्यात घेवुन त्यांचे नांव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नांव 1) अरविंद वसंत वाघमारे वय- 25 वर्षे रा. संजयनगर काटवन खंडोबा असे असल्याचे सांगितले आहे.
ताब्यातील इसमाच्या कब्जातुन 1,00,000/-रु कि.ची एक ओमनी चारचाकी वाहन, 5000/-रु कि.ची एक मोटार कॉम्प्रेसर व दोन रबरी पाईप व एका बाजुस रेगुलेटर व दुसरी बाजुस नोझल, 7,500/- रु कि.च्या 3 गॅस टाक्या, 5,000/- रु. कि. चा एक इलेक्ट्रीक वजन काटा, असा एकुण 1,17,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता, एच. पी. गॅस कंपनीच्या घरगुती व व्यवसाईक वापराच्या गॅस टाक्यामधुन चारचाकी वाहनामध्ये रिफिंलिंग करतांना ज्वलनशिल पदार्थाबाबत पुरेशी काळजी न घेता स्वत:चे व इतरांचे जिवीतास धोका होईल अशा धोकादायक पध्दतीने ठेवुन, विक्री करण्याचे उद्देशाने आपले कब्जात बाळगतांना मिळुन आल्याने आरोपी विरुध्द कोतवाली पो. स्टे. गु. र. नं. 121/2026 भारतीय न्याय संहिता कलम 125,287,288, सह जीवनावश्यक वस्तु कायदा कलम 3, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे