देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : आहिल्यानगर, दि. 25 नोव्हेंबर :मा.श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने श्री.संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोलीस अंमलदार अभिजीत अरकल, रणजीत जाधव, अजिनाथ पाखरे व बाळासाहेब गुंजाळ अशांना अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.
दिनांक 24/11/2026 रोजी पथक कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंदयाची माहिती काढत असताना गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम जुना टाकळी रोड, गिरमेसिटी श्रीनगर, कोपरगाव रोडने मोपेडवरून सुगंधीत तंबाखु व पान मसाला विक्री करण्यासाठी येत आहे. मिळालेल्या माहितीवरून पथकाने पंचासमक्ष जुने टाकळी रोडवर बाबा चौक, कोपरगाव येथे सापळा रचुन थांबले असता एक इसम मोपेड गाडीवर येताना दिसून आला त्यास थांबवून, मोपेड गाडीवरील गोणीमध्ये सुगंधीत तंबाखु व पानमसाला मिळून आल्याने 1) सागर जयराम ताकवले, वय 29, रा.सुभाषनगर, कोपरगाव, ता.कोपरगाव, जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीचे कब्जातून 29,876/- रू किं.विमल रजनीगंधा पानमसाला,सुगंधीत तंबाखु, 50,000/- रू किं.त्यात सुझुकी कंपनीचे मोपेड क्रमांक एमएच-17-बीआर-9230 असा एकुण 79,876/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ताब्यातील आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून, आरोपविरूध्द कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुरनं 743/2026 बीएनएस कलम 123, 223, 274, 275, 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
वरील कारवाई ही मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा