गुन्हेगारी

घरातून गांजाची विक्री करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात आरोपीसह 11.182 किलो गांजाचा मुद्देमाल जप्त

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : आहिल्यानगर, दि. 20 नोव्हेंबर : मा.पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने श्री.संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी सपोनि/हरिष भोये व पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, रिचर्ड गायकवाड, विकास साळवे, अशोक लिपणे, शामसुंदर जाधव, मनोज साखरे व नंदिनी झिने अशांचे पथक तयार करून जिल्हयातील अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन, कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले. 
दिनांक 19/11/2026 रोजी पथक नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती घेत असताना  गोपनीय माहिती मिळाली की, शाहमद मेहबुब शेख, रा.मुलानीवाडा, जुम्मा मस्जीदजवळ, कुकाणा, ता.नेवासा याचे घरामध्ये गांजा असून तो त्याची विक्री करत आहे. पथकाने मिळालेली गोपनीय माहिती नेवासा पोलीस स्टेशनला लेखी अहवालाद्वारे कळविली.त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे आदेशान्वये सपोनि/अमोल पवार, नेवासा पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक कारवाई करण्याकरीता पंचासह आवश्यक त्या साहित्यासह मिळालेल्या माहितीतील शाहमद मेहबुब शेख याचे राहते घरी जाऊन पंचासमक्ष घराची पाहणी केली.घरामध्ये गांजा मिळून आल्याने 1) शाहमद मेहबुब शेख, वय 48, रा.मुलाणीवाडा, जुम्मा मस्जीदजवळ, कुकाणा, ता.नेवासा, जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीचे घरातून 5,59,100/- रू किं.त्यात तीन गोण्यामधील 11.182 किलोग्रॅम वजनाचा गांजा, 1,000/- रू किं.त्यात एक वजन काटा, 300/- रू किं.त्यात वजन मापे, 200/- रू किं.त्यात स्टीलचे भांडे, 100/- रू किं.त्यात प्लॅस्टीक पिशव्या असा एकुण 5,60,700/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पथकाने ताब्यातील आरोपीकडे जप्त मुद्देमालाबाबत अधिक विचारपूस करता, आरोपीने जप्त मुद्देमाल हा 2) मल्हारी मोहन बोरूडे, रा.मजलेशहर, ता.शेवगाव, जि.अहिल्यानगर याचेकडून खरेदी केला असल्याची माहिती सांगीतली.आरोपीने सांगीतलेल्या माहितीवरून पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले.आरोपीस मुद्देमालासह नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर केले असून त्याचेविरूध्द नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. 948/2026 गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन 1985 चे कलम 8 (क), 20(ब), 20 (2)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला.
वरील कारवाई मा.श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे