सांत्वन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले येत्या २३ नोव्हेंबर रोजी वैजापूर येथे दिवंगत रोहित पठारे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क मुंबई दि. १७ नोव्हेंबर – छत्रपती संभाजी नगर मधील वैजापूर येथे दलित तरुण रोहित पठारे यांची निर्घुण हत्या करण्यात आली. ही हत्या मानवतेला काळीमा फासणारी आहे. या हत्या प्रकरणाचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. या हत्याकांडातील सर्व आरोपींना अटक करून कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे. अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली आहे. येत्या २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ना. रामदास आठवले हे वैजापूर येथे दिवंगत रोहित पाठारे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. अशी माहिती रिपब्लिकन पक्षाच्या वतीन देण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर मधील वैजापुरातील रोहित पाठारे या दलित तरुणाची सामूहिक हल्ल्यात निर्घुण हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीन ना. रामदास आठवले यांनी यापूर्वीच तीव्र निषेध केलेला आहे. या प्रकरणाची त्यांनी गांभीर्याने दाखल घेतली असून येत्या २३ नोव्हेंबर रोजी ना. रामदास आठवले वैजापूर दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ना. रामदास आठवले वैजापूरात दिवंगत रोहित पठारे कुटुंबियांची संत्वनपर भेट घेणार आहेत.



