देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर. दि. 17 फेब्रुवारी: प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 09/02/2026 रोजी 09/30 वा.चे सुमारास निंबळक एम.आय.डी.सी प्लॉट नं. 07 व 08 येथे सुयश मेटल प्रोसिंग्स प्रा. लि. येथे अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे, राजेश पाटील व त्याचे इतर 4 अनोळखी इसमांनी बेकायदेशीरपणे कंपनीमध्ये प्रवेश करुन, कंपनीचे मॅनेजर प्रकाश जनार्दन कोकाटे यांना शिवीगाळ व दमदाटी करुन काम बंद करण्यास लावुन काम चालु करायेच असेल, तर दर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुला व तुझ्या मालकाला जिवे ठार मारुन टाकु असे म्हणुन खंडणी मागुन मॅनेजर प्रकाश कोकाटे यांचेकडुन दमदाटी करुन वीस हजर रुपयेची खंडणी घेतली. तसेच त्यांनी सर्व कामगारांना बोलवुन त्यांचे अखिल भारतीय कामगार संघटनेस मान्यता देणेबाबत चिथावणी दिली होती.
त्यानंतर निंबळक एम.आय.डी.सी येथील कंपनीचे उद्योजकांनी सदर घटनेबाबत मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांची प्रत्यक्ष भेट घेवुन संबंधीत इसमाविरुध्द कारवाई करणे बाबत निवेदन दिले. तसेच “मा. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य यांनी एम.आय.डी.सी मधील कंपनीचे उद्योजकांना कोणी त्रास देत असले, तर त्यांना कायद्याने ठोकुन काढा ” असे अहिल्यानगर जिल्हा दौ-याचे वेळी सुचना दिली होती.
त्याप्रमाणे मा. पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी निंबळक एम.आय.डी.सी. येथे सुयश मेटल प्रोसिंग्स प्रा. लि.या कंपनीकडुन दमदाटी करुन खंडणी घेतलेल्या अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे, राजेश पाटील व त्याचे इतर 4 अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल करणे बाबत आदेश दिल्याने वरील आरोपीविरुध्द एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन गु.र.नं. 118/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 308(5), 308(4), 329(4), 189(2), 191(2), 190, 325, 351(2), 324(3) प्रमाणे गुन्हा करण्यात आला आहे.
त्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपी भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे रा. एम.आय.डी.सी.,अहिल्यानगर याला ताब्यात घेवुन त्यास सदर गुन्ह्यात अटक करुन त्याची 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालु आहे.
आरोपी भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे याचेविरुध्द खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत
अ.नं. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 तोफखाना, अहिल्यानगर 19/2005 भादवि कलम 353,332,504,506
2 कोतवाली, अहिल्यानगर 26/2011 भादवि कलम 143,147,148,149,323
3 कोतवाली, अहिल्यानगर 302/2009 भादवि कलम 302,201,120(ब),214,466 आर्म ऍ़क्ट 3/25
4 तोफखाना, अहिल्यानगर 379/2014 भादवि कलम 307,323,504,506,34 आर्म ऍ़क्ट 3/25
तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व एम.आय.डी.सी मधील सर्व कंपनी उद्योजक व कामगारांना सुचित करण्यात येते की, जो कोणी एम.आय.डी.सी मधील कंपनीचे उद्योजक व कामगारांना त्रास देईल, अशा इसमांविरुध्द तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दयावी. कंपनी उद्योजकांना अशा प्रकारे त्रास देणा-या इसमांविरुध्द कठोर कारवाई करुन कंपनी उद्योजकांना संरक्षण देण्यात येईल.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा