देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क अहिल्यानगर, दि. 26 नोव्हेंबर :
जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात ‘भारतीय संविधान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.
यावेळी २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना मौन पाळून आदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमास रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा