दिनविशेष

“स्वातंत्र्य दिनाचा वाटत आहोत खाऊ! हिंदू, मुस्लिम, सीख, इसाई आपण सर्वजण आहोत भाऊ, चांगले शिक्षण घेऊन पुढे, पुढे जाऊ” : महेश भोसले स्वातंत्र्यदिनानिमित्त संबोधी विद्यार्थी वसतिगृह येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क अहिल्यानगर दि. 15 ऑगस्ट :80 स्वतंत्र दिन संपूर्ण भारतभर राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर बहुजन शिक्षण संचलित फकीरवाडा येथील संबोधी विद्यार्थी वसतिगृह येथे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त खाऊ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. तिरंगा झेंडा निवृत्त नायब तहसीलदार गिरीष गायकवाड यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते फडकविण्यात आला. यावेळी तिरंगा झेंड्याला अभिवादन करत सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतांना सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार महेश भोसले म्हणाले, गिरीष गायकवाड, सुरेश भिंगारदिवे, सुखदेव साळवे यांच्या माध्यमातून “स्वातंत्र्य दिनाचा वाटत आहोत खाऊ,हिंदू, मुस्लिम, सीख, इसाई आपण सगळे आहोत भाऊ, शिक्षण घेऊन आपण पुढे, पुढे जाऊ! ” असे म्हणत विद्यार्थी मित्रांना स्वातंत्र्य दिनाच्या व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी देशस्तंभ न्यूजचे उपसंपादक सुरेश भिंगारदिवे, सामाजिक कार्यकर्ते सुखदेव साळवे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हा अध्यक्षा,शांतता समिती सदस्या गौतमी भिंगारदिवे, रियांश मल्टीस्टेटच्या उद्योजिका शोभा माने, दुर्गा काटे,लता बर्डे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसतिगृहाचे अधीक्षक रविंद्र तपासे यांनी करत सर्व मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी वसतिगृहाचे मदतनीस महेंद्र शिंदे विध्यार्थी व महिला कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे