दिनविशेष

ठाकरे शिवसेनेच्या वतीने स्व. अनिलभैय्या राठोड यांना पुण्यतिथी दिनी अभिवादन

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 5 ऑगस्ट :(प्रतिनिधी ): अहिल्यानगर शहरातील तळागाळातील सर्वसामान्य माणसाच्या गळ्यातली ताईत असणारे स्व. अनिलभैय्या राठोड यांच्या पुण्यतिथी निम्मित चितळे रोड येथील शिवालयात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी महानगर प्रमुख किरण काळे यांच्यासह विक्रम राठोड, उपजिल्हाप्रमुख दीपकदादा भोसले, अल्पसंख्यांक आघाडीचे अनिस चुडीवाला, उपशहर प्रमुख मनोज गुंदेचा, उपशहर प्रमुख सुनील भोसले, जिग्नेश जग्गड, शुभम मिरांडे आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी शिवसैनिकांनी स्व. राठोड यांच्या आठवणींना उजाळा दिला. काळे यावेळी म्हणाले, स्व.अनिलभैय्या आज हयात नाहीत. मात्र आजही ते आपल्यात आहेत अशी अनुभूती कायम सामान्य माणसांना मिळत असते. सर्वसामान्यांच्या हिताच्या रक्षणासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. स्व. अनिलभैय्या यांच्या नसण्याची उणीव समस्त नगरकारांच्या मनाला आजही अस्वस्थ करणारी आहे. शिवसेना ही स्व.अनिलभैय्या यांनी दाखवलेल्या सर्वसामान्य जनतेसाठी काम करण्याच्या विचारांवर कायम काम करीत राहील. सर्वसामान्य माणसाने रात्री अपरात्री केव्हाही अनिलभैयांना फोन केला तरी त्यांच्या मदतीला ते तत्परतेने धावून जायचे. आपण फोन केला तर तो फोन उचलला जाईल आणि भैय्या लगेच उपस्थित होतील असा विश्‍वास सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये होता.
काळे पुढे म्हणाले, अनिलभैय्या आपल्यात नसण्याची आजही एक पोरकेपणाची भावना नगरकरांच्या मनामध्ये आहे. अनिलभैय्या शरीराने जरी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार जिवंत राहण्याची गरज आहे. म्हणूनच शहरातील ठाकरे शिवसेना त्यांच्या विचारांवर काम करीत असून कायम या विचारांची जपणूक करण्यासाठी कटिबद्ध राहील,
अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे