देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 10मे : आज MOTHERS DAY आई चा दिवस
हा दिवस कोणी ठरवला माहित नाही पण आई शिवाय एक दिवस तरी राहू शकतो का, आई नसली तर काय? हा प्रश्न त्यांना विचारा ज्यांच्या बालपणातच आई सोडून गेली, त्यांना विचारा ज्यांना आईची मायाच मिळाली नाही, त्यांना विचारा ज्यांनी आईच पाहिली नाही, आई शिवाय हे जगच अधुरे आहे, आई शिवाय आपले कुटुंब पूर्णच होऊ शकत नाही,
आई ही एक अशी स्त्री आहे की जी कधी स्वतःची इच्छा कधीच कोणाला सांगू शकत नाही कारण तीला सम्पूर्ण कुटुंबाचे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची इच्छा पूर्ण करावयाची असते. आईच फक्त स्वतः उपाशी राहून मुलांना खाऊ घालू शकते, आई ही संपुर्ण कुटुंबाची भिंत असते की जी कधीच डळमळू शकत नाही. आईच असते की जीला कुटुंबामध्ये कोणतीही आनंदाची गोष्ट घडली तर तिला सर्वात जास्त आनंद होते व आईच असते की जीला कुटुंबामध्ये कोणतेही दुःख घडले तर सर्वात जास्त दुःख तिलाच होते पण ती कोणाला दाखवू शकत नाही. आई ही मायेची सागर असते, आई दुधावरील साय असते आई विना आपले सर्व कुटुंबच अपूर्ण असते आईचे प्रेम हे अथांग महासागरा सारखे असते. मग अशा आईचा दिवस म्हणून एकच दिवस साजरा करणे योग्य का? पण कधी कधी असेही वाटते या दिवशी तरी जे आईला आठवणच करीत नाही ते किमान आठवण तरी करतील, तिच्याशी बोलतील तरी, तिला काय हवय हे विचारतील तरी म्हणूनच कोणी तरी बोलून गेले आई विना भिकारी…. आजच्या या दिवशी मला एकच सांगायचं आहे ज्यांना आई आहे त्यांनी त्या माऊलीची काळजी घ्या, तिची रोज विचारपूस करा, तिला काय पाहिजे काय नाही या कडे लक्ष द्या, त्या माऊलीला तुमच्याकडून काहीच लागत नाही तिला फक्त मला माझ्या कुटुंबातील सदस्यांनी प्रेमाने बोलावे हिच माफक अपेक्षा असते. व आपण नक्कीच आजच्या दिवशी एक प्रण कराल की, आज पासून नक्कीच मी माझ्या आईची काळजी घेईल.मग नक्कीच हा आईचा दिवस साजरा झाल्याशिवाय राहणार नाही….
आई बाबतच्या माझ्या भावना व्यक्त केल्यात नक्कीच या मध्ये काही नाही तर बरेच काही राहून गेले……..
श्रीनिवास बोज्जा
9890812000.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा