ब्रेकिंग
व्यापा-याला अडवुन मारहाण करुत बळजबरीने पैसे काढुन घेणाऱ्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 9 मे : राहुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. 391/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 119(1), 115(2), 333, 351(2), 352, 189(2), 191(1), 191(3), 190, 194(2) प्रमाणे दिनांक 18/04/2026 रोजी गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांनी आरोपीविरुध्द दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरुन आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन फिर्यादीस जिवे ठार मारण्याचे उद्देशाने मारहाण करुन त्यांचेकडुन 25,400/- रुपये रोख रक्कम बळजबरीने काढुन घेतलेले आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपीचे शोध घेणेकामी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींची माहिती काढत असतांना पथकास व्यवसायीक कौशल्याचे आधारे सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे प्रशांत रावसाहेब पलघडमल रा.सात्रळ ता.राहुरी हा निमगाव खुर्द ता.संगमनेर येथील अमरधाम येथे थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन सापळा रचुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव प्रशांत उर्फ चाचा रावसाहेब पलघडमल वय- 32 वर्षे रा.सात्रळ ता.राहुरी हा निमगाव खुर्द ता.संगमनेर जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्यास गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदासह केले असल्याची कबुली दिली आहे.
ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करुन अटक करण्यात आले असुन पुढील तपास राहुरी पोलीस ठाणे करीत आहे.




