निधन

फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीच्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंदा रमेश भोसले यांचे निधन

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 2 नोव्हेंबर : शिव, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील सिद्धार्थनगर भागातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंदा रमेश भोसले (वय 68 ) यांचे जिल्हा रुग्णालय येथे उपचारा दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, नातू, बहीण, दोन भाऊ तसेच नातेवाईक असा मोठा परिवार आहे. जेष्ठ मार्गदर्शक प्रकाश साळवे व किशोर साळवे यांच्या त्या भगिनी होत्या तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले ) गटाचे शहर जिल्हा अध्यक्ष किरणभाऊ दाभाडे यांच्या त्या मावशी होत. सिद्धार्थ नगर भागातील विविध सामाजिक प्रश्नात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग होता.
त्यांच्या निधनाने कार्यकर्ते व नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा अंत्यविधी आज दि. 2 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता नालेगाव येथील अमरधाम येथे होणार आहे.
त्यांना आंबेडकरी चळवळीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे