गुन्हेगारी

मुलानेच केला पित्याचा खुन तपासात निष्पन्न वाकोडी येथील दुर्दैवी घटना

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 26 ऑक्टोबर :प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 24/10/2026 रोजी रात्री 11.00 वा.सुमारास वाकोडी येथील पाण्याचे टाकीजवळ यातील मयत दिलीप करमदास भोसले, वय 42, रा.वाकोडी शिवार, सोलापूर रोड, अहिल्यानगर यास अज्ञात आरोपीतांनी मारहाण करुन जीवे ठार मारले.याबाबत पोकॉ/2644 बिभीषण काशिनाथ दिवटे, नेम.भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गुरनं 546/2026 बीएनएस कलम 103 (1) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
खुनाच्या गुन्हयांची प्राथमिक माहिती मिळताच मा.पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आरोपीचा शोध घेणेबाबत आदेश दिले.त्यानुषंगाने श्री.संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी सपोनि/हरिष भोये व पोलीस अंमलदार अतुल लोटके, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे, प्रशांत राठोड व भगवान धुळे अशांचे पथक तयार करून गुन्हयातील आरोपीचा शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.  
  तपास पथकाने घटनाठिकाणी भेट देऊन, गोपनीय माहिती, तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयाचा समांतर तपास करत असताना नमूद गुन्हा हा मयताचे मुले अंबर दिलीप भोसले व रोहित दिलीप भोसले, दोन्ही रा.वाकोडी, ता.अहिल्यानगर यांनी केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने तात्काळ वाकोडी ता.अहिल्यानगर परिसरात आरोपीचा शोध घेऊन 1) अंबर दिलीप भोसले, वय 19, रा.वाकोडी, ता.अहिल्यानगर यास ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीस गुन्हयाचे तपासकामी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात असून पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
वरील कारवाई मा.श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा.श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे