देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 13 ऑक्टोबर : प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 01/10/2026 रोजी दुपारी 01.00 वा.सुमारास यातील फिर्यादी दिपक सुधाकर येळाई, वय 62, रा.मेन रोड क्रांती चौक, पाथर्डी हे त्यांचा प्लॉट विक्रीचे पैसे घेऊन क्रांती चौक येथे जात असताना दोन विनाक्रमांकाच्या मोटार सायकलवरु चार अनोळखी आरोपी येऊन त्यांनी फिर्यादीचे हातावर लोखंडी सुरा मारला.तसेच कुकरीचा धाक दाखवून त्यांचेकडील पैशाची बॅग जबरीने चोरुन नेली.याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 1196/2026 बीएनएस कलम 309 (6), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
मा.पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने श्री संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी पोउपनि/विकास जाधव व पोलीस अंमलदार अरूण गांगुर्डे, अतुल लोटके, रणजीत जाधव, बाळासाहेब खेडकर, योगेश कर्डीले, किशोर शिरसाठ व प्रशांत राठोड याचे पथक तयार करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.
दिनांक 12/10/2026 रोजी तपास पथक गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयाचा समांतर तपास करत असताना खात्रीशीर माहिती मिळाली की, नमूद गुन्हा हा मुदस्सर उर्फ मुज्जु सय्यद याने त्याचे साथीदारासह केला असून तो सध्या एम.एम.निऱ्हाळी हायस्कुलजवळ, माणिकदौंडी रोड, पाथर्डी येथे आहे.मिळालेल्या माहितीवरून पथकाने नमूद ठिकाणी आरोपीचा शोध घेऊन 1) मुदस्सर उर्फ मुज्जु सादीक सय्यद, वय 22, रा.एडके कॉलनी, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीस गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार 2) साहिल खान, रा.तिसगाव, ता.पाथर्डी (फरार) 3) राजू ठाकुर पुर्ण नाव माहित नाही रा.दिल्ली (फरार) 4) सुरज संतोष वडागळे, रा.बेल्हेकरवाडी रोड, सोनई, ता.नेवासा 5) आकाश शरद हराळे, रा.सोनई, ता.नेवासा 6) विशाल ब्राम्हणे पुर्ण नाव माहित नाही रा.शनिशिंगणापूर, ता.नेवासा 7) सोमनाथ रमेश काळोखे, रा.पाथर्डी, ता.पाथर्डी (फरार) 8) इसाक पापा शेख, रा.दुलेचांदगाव, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर 9) राजू ठाकूर याचे दोन मित्र नाव पत्ता माहित नाही यांचेसह केल्याची माहिती दिली.आरोपीने साथीदारांच्या सांगीतलेल्या माहितीवरून त्यांचा शोध घेऊन सुरज संतोष वडागळे, रा.बेल्हेकरवाडी रोड, सोनई, ता.नेवासा, आकाश शरद हराळे, रा.सोनई, ता.नेवासा, इसाक पापा शेख, रा.दुलेचांदगाव, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.
ताब्यातील आरोपी मुदस्सर उर्फ मुज्जु सादीक सय्यद याचेकडे गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने चोरी केलेल्या रक्कमेपैकी त्याचे वाटयास 2,00,000/- रूपये असून आरोपी विशाल ब्राम्हणे यास 70,000/- व उर्वरीत सर्व रक्कम ही आरोपी साहिल खान व राजू ठाकुर यांचेकडे असल्याचे सांगीतले. आरोपी मुदस्सर उर्फ मुज्जु सादीक सय्यद याने त्याच्या वाटयास आलेले रक्कमेतून 30,000/- रूपये खर्च केले असून उर्वरीत रक्कम घरी ठेवल्याची माहिती दिली.यावरून पथकाने पंचासमक्ष तपासकामी 1,70,000/- रूपये रोख रक्कम, एक पिशवी व 10,000/- रू किं.त्यात एक मोबाईल असा एकुण 1,80,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केले असून, गुन्हयाचा पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले.
वरील कारवाई ही मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा