दिनविशेष

संविधान दिन सामाजिक बांधिलकी आणि अधिकार-जाणिवेचे प्रतीक- आमदार संग्राम जगताप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन; संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक पठन

 

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर दि. 26 नोव्हेंबर (प्रतिनिधी)- समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मार्केटयार्डसमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक पठन करण्यात आले. यावेळी संविधानाच्या सामूहिक पठनाने परिसर दुमदुमून गेला. आमदार संग्राम जगताप यांना संविधानाच्या उद्देशिकेची प्रत देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या भारतीय संविधानामुळे जगाला प्रगल्भ लोकशाहीची प्रचिती आली. राजेशाहीचा अंत करून देशाची सूत्रे सर्वसामान्य मतदारांच्या हातात देण्याचे ऐतिहासिक कार्य संविधानाने केले. संविधान हे कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण भारतीयांचे आहे. संविधानामुळे देशात समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचा भक्कम पाया निर्माण झाला आहे. या संविधानिक मूल्यांचे जतन करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली.
याप्रसंगी सुरेश बनसोडे म्हणाले की, संविधान दिन हा सामाजिक बांधिलकी आणि आपल्या अधिकारांच्या जाणीवेचे प्रतीक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे आपल्या आयुष्याचे दिशादर्शक आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचविण्यासाठी संविधानाने मजबूत चौकट निर्माण केली आहे. त्यामुळे प्रत्येकाने संविधानातील मूल्यांचे जतन, पालन आणि प्रसार करण्याचे कार्य सातत्याने केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आमदार संग्राम जगताप, सुरेशभाऊ बनसोडे, सुमेध गायकवाड, इंजि. परिमल निकम, प्रा. माणिक विधाते,सर, प्रा. जयंत गायकवाड, अमित काळे, सिद्धार्थ आढाव, विलास साठे, विजयराव भांबळ, महेश भोसले, प्रा.डी.आर. जाधव, प्रा. हनुमंत गायकवाड,कौशल गायकवाड, विशाल भिंगारदिवे, गौतमी भिंगारदिवे, सृजन भिंगारदिवे, प्रा. एल.बी. जाधव, प्रा. कदम सर, मृणाल भिंगारदिवे, अजय पाखरे, लक्ष्मण माघाडे,माधवराव चाबुकस्वार, विवेक विधाते, निखिल साळवे, गौतम म्हस्के, यशवंत भाबळ, गौतम पाचारणे सुरेश भिंगारदिवे , दीपक पाटोळे, श्रेयस भिंगारदिवे, सतीश शिरसाठ, अंकुश मोहिते, रवी कांबळे, संजय भिंगारदिवे, प्रा. गजभिये सर, अविनाश कांबळे, आकाश कदम, नितीन खंडारे, बौद्धचार्य ठोंबे यांच्यासह आंबेडकरी समाजातील विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे