देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 23 ऑक्टोबर :प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 26/09/2026 रोजी यातील फिर्यादी गणेश अनिल रासकर, वय 28, रा.वाघुंडे, ता.पारनेर यांचा जेसीबी इंडीयन ऑईल कंपनीच्या पेट्रोलपंपाच्या पार्कीगमधुन अज्ञात आरोपीतांनी चोरून नेला.याबाबत सुपा पोलीस स्टेशन गु.र.नं. 334/2026 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
मा.पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने श्री संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर व श्रीमती ज्योती गडकरी, पोलीस निरीक्षक, सुपा पोलीस स्टेशन यांनी यांनी पोउपनि/कृष्णकुमार सेदवाड व पोलीस अंमलदार गणेश लबडे, श्यामसुंदर जाधव, किशोर शिरसाठ, अमृत आढाव, महादेव भांड, फुरकान शेख, प्रशांत राठोड, सर्व नेम.स्थानिक गुन्हे शाखा व मेघराज कोल्हे नेम. सुपा पोलीस स्टेशन अशांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.
दिनांक 22/10/2026 रोजी तपास पथक गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयाचा तपास करताना खात्रीशीर माहिती मिळाली की, विशाल दुबीले, रा.शिवपूर, ता.गंगापूर, जि.छ.संभाजीनगर याने त्याचे साथीदारासह जेसीबी चोरून नेला असून तो शेकटा, ता.पैठण, जि.छ.संभाजीनगर गावचे शिवारात वीटभट्टीजवळ लपवून ठेवला आहे.पथकाने पंचासमक्ष मिळालेल्या माहितीवरून नमूद ठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेऊन 1) विशाल काकासाहेब दुबीले, वय 22, रा.शिवपूर, ता.गंगापूर, जि.छ.संभाजीनगर व 2) प्रदिप बाबासाहेब सुकासे, वय 20, रा.नागापूर, ता.गंगापूर, जि.छ.संभाजीनगर यांना ताब्यात घेतले.आरोपीकडे गुन्हयांच्या अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी विशाल काकासाहेब दुबीले याने वरील आरोपीसह त्याचे आणखी दोन साथीदारासह क्रेटा गाडीने सुपा येथील पेट्रोलपंपावर लावलेला जेसीबी चोरल्याची माहिती सांगीतली.आरोपी सांगीतलेल्या साथीदारांच्या नावावरून पथकाने त्यांचा शोध घेऊन 3) गौरव योगेश त्रिभुवन, वय 19, रा.रागीरीनगर, वैजापूर, ता.वैजापूर, जि.छ.संभाजीनगर 4) संग्राम चंद्रहास डरे, वय 20, रा.कननक सागज, ता.वैजापूर, जि.छ.संभाजीनगर यांना ताब्यात घेतले.
पथकाने गुन्हयाच्या तपासात 30,00,000/- रू किं.त्यात एक जेसीबी व 13,00,000/- रू किं.एक विनाक्रमांकाची क्रेटा असा एकुण 43,00,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह सुपा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात असून, गुन्हयाचा पुढील तपास सुपा पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
वरील कारवाई ही मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व सुपा पोलीस स्टेशनचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा