गुन्हेगारी

रात्रीच्या घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडून उघड 4 आरोपी कोळगाव, ता.श्रीगोंदा येथून ताब्यात

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 12 ऑक्टोबर : प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 08/10/2026 रोजी रात्री यातील फिर्यादी नवनाथ कारभारी पाबळ, वय 50, रा.पानोडी, ता.संगमनेर यांचे घराचे दरवाजाचे कुलूप तोडून, कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागीने चोरून नेले.याबाबत आश्वी पोलीस स्टेशन गु.र.नं. 212/2026 बीएनएस कलम 331 (4), 303(अ) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
मा.पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने श्री संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी पोउपनि/संदिप दरवडे व पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, अरविंद भिंगारदिवे, योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, अशोक लिपणे, प्रताप देवकाते, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, सतीष भवर याचे पथक तयार करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.
दिनांक 11/10/2026 रोजी तपास पथक गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयाचा समांतर तपास करत असताना सदरचा गुन्हा हा सायरब जैनु काळे याने त्याचे साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले.सायरब जैनु काळे हा त्याचे साथीदारासह कोळगाव ता.श्रीगोंदा गावचे शिवारात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.पथकाने कोळगाव परिसरात शोध घेऊन 1) सायरब जैनु काळे, रा.बिलोनी, ता.वैजापूर, जि.छत्रपती संभाजीनगर 2) कलर सुरेश काळे, वय 22, 3) सोन्या सुरेश काळे, वय 20 व 4) संदिप सुरेश काळे, वय 21 अ.क्र.2 ते 4 रा.लगडवाडी, कोळगाव, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.
गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस करता सायरब जैनु काळे याने नमूद गुन्हा वरील आरोपीसह 5) अमरेश निजाम काळे (फरार) 6) बाबु टबुक्या चव्हाण (फरार) व 7) घाऱ्या टबुक्या चव्हाण (फरार) अ.क्र.5 ते 7 रा.महालगाव, ता.वैजापूर, जि.छत्रपती संभाजीनगर अशांना मिळून केल्याची माहिती सांगीतली.
ताब्यातील आरोपीस गुन्हयाचे तपासकामी आश्वी पोलीस स्टेशन येथे हजर केले असून गुन्हयाचा पुढील तपास आश्वी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
वरील कारवाई ही मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे