देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 12 ऑक्टोबर : प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 30/09/2026 रोजी यातील फिर्यादी सोपान पोपटराव डोलनर, वय 36, रा.चिखलठाण, ता.राहुरी यांची आई साकुर बस स्थानक, ता.संगमनेर येथे बसलेल्या असताना अनोळखी तीन आरोपीतांनी त्यांना भूरळ फसविले.फिर्यादीचे आईने गळयातील सोन्याचे मंगळसुत्र आरोपीतांना काढुन दिले.याबाबत घारगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. 393/2026 बीएनएस कलम 319 (2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.मा.पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने श्री संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी पोउपनि/कृष्णकुमार सेदवाड व पोलीस अंमलदार निळकंठ कारखेले, राहुल द्वारके, गणेश लोंढे, विशाल तनपुरे, रोहित मिसाळ, भगवान सानप, फुरकान शेख व प्रशांत राठोड याचे पथक तयार करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.
दिनांक 11/10/2026 रोजी तपास पथक गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयाचा समांतर तपास करत असताना खात्रीशीर माहिती मिळाली की, नमूद गुन्हा हा सचिन संजय गायकवाड, रा.औरंगपूर, ता.शिरूर, जि.बीड याने त्याचे साथीदारासह केला आहे.पथकाने त्याचा शोध घेऊन तो खरवंडी, ता.पाथर्डी परिसरात मिळून आल्याने 1) सचिन संजय गायकवाड, रा.औरंगपूर, ता.शिरूर, जि.बीड यास ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीस गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार 2) संतोष मोहनराव चिंतामणी, रा.नाळवंडी नाका, ता.जि.बीड 3) शहादेव रामदास जाधव, रा.वडवणी, ता.जि.बीड (फरार) 4) आबा तुपे पुर्ण नाव माहित नाही रा.औरंगपूर, ता.शिरूर, जि.बीड (फरार) यांचेसह केल्याची माहिती दिली.आरोपीने साथीदारांच्या सांगीतलेल्या माहितीवरून त्यांचा शोध घेऊन संतोष मोहनराव चिंतामणी, रा.नाळवंडी नाका, ता.जि.बीड यास ताब्यात घेतले.
ताब्यातील आरोपीकडे त्यांनी आणखी कोठे गुन्हे केले आहेत काय बाबत विचारपूस केली असता आरोपी सचिन संजय गायकवाड याने वरील साथीदारासह मिरजगाव, ता.कर्जत, नेवासा व चांदेकसारे, ता.कोपरगाव येथे जास्तीचे सोने देण्याचे आमीष दाखवून फसवणुक करून सोन्याचे दागीने घेतले.आरोपीने सांगीतलेल्या माहितीवरून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन गुरनं व कलम
1 नेवासा 744/2026 बीएनएस कलम 318 (4)
2 कोपरगाव तालुका 445/2026 बीएनएस कलम 318 (4), 3(5)
3 मिरजगाव 241/2026 बीएनएस कलम 316 (2), 318(5), 3(5)
पथकाने वरील नमूद गुन्हयात गेलेल्या सोन्याचे दागीन्यांबाबत तपास करून पंचासमक्ष 6,60,000/- रू किं.त्यात 44 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त केली आहे.ताब्यातील आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह मिरजगाव पोलीस स्टेशन गुरनं 241/2026 या गुन्हयाचे तपासकामी मिरजगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले.
वरील कारवाई ही मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा