निधन

नाना पाटेकरांनतर मराठी चित्रपट सृष्टीला आणखी एक धक्का!ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन

 

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 12 ऑक्टोबर :  जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर मराठी चित्रपट सृष्टीला आणखी एक धक्का बसला आहे.जेष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे (73 वय ) निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टी, नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Screenshot

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मुळ रहिवासी, ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर याचं पुण्यात वयाच्या ७३ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. यांच्या निधनाने मराठी कलाविश्वातील एक प्रभावी पर्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

२७ नोव्हेंबर २०१६ रोजी लावणीच्या कार्यक्रमानंतर त्यांना पक्षाघाताचा (स्ट्रोक) झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी असल्याचेही त्या वेळच्या वृत्तांत नमूद होते.त्यानंतर त्या अंथरुणावर खिळूनच होत्या.
‘शापित’ या चित्रपटातील त्यांच्या दमदार अभिनयाने त्यांना विशेष ओळख मिळाली. ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. अस्सल लावणी, सहज अभिनय आणि ग्रामीण स्त्रीजीवनाचे प्रभावी चित्रण ही त्यांच्या कलेची वैशिष्ट्ये होती.
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क, डिजिटल परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण शद्धाजंली 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे