निधन

‘जय जय रामकृष्ण हरी’च्या गजरात जेष्ठ नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिवंगत भानुदास एकनाथ कोतकर अनंतात विलीन

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 24 ऑक्टोबर : अहिल्यानगर शहराचे जेष्ठ नेते केडगावचे भाग्यविधाते कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिवंगत भानुदास एकनाथ कोतकर (वय 75) यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले.
सायंकाळी 6 वाजता केडगाव येथे ‘जय जय रामकृष्ण हरी ‘ च्या गजरात ते अनंतात विलीन झाले. यावेळी माजी महापौर संदीपदादा भानुदास कोतकर यांनी त्यांना मुखागणी दिली. यावेळी नगरसेवक मनोज कोतकर व कोतकर परिवारातील सर्व कुटुंबिय तसेच खासदार निलेश लंके, आमदार विठ्ठलराव लंघे,आमदार मोनिकाताई राजळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे,आमदार संग्राम भैय्या जगताप,आमदार आशुतोष काळे, आमदार अक्षय कर्डीले, माजी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान संचालक सचिनभाऊ जगताप,पदमश्री पोपटराव पवार, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस, महानगर पालिकेचे उपमहापौर धनंजय जाधव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष अनिल शिंदे, शिवसेना अहिल्यानगर शहराचे नेते विनोद गायकवाड, देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्कचे संपादक महेश भोसले, पत्रकार अशोक तांबे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका अनुराधाताई नागवडे, नगरसेवक महेश लोंढे, बाळासाहेब पवार, निखिल वारे, नगर तालूका पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक गणेश वारुळे,जिल्हा परिषद सदस्य प्रवीणदादा घुले, दरेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच अनिल करांडे, तसेच कृषी उत्पन्न समितीचे आजी, माजी संचालक व विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध वृत्तपत्र प्रतिनिधी , विविध वाहिन्याचे प्रतिनिधी व अहिल्यानगर जिह्यातील, शहरातील, केडगाव परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे