गुन्हेगारी

फायरिंगसह कोयता-चाकुने प्राणघातक हल्ला करणारे 3 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 11 ऑक्टोबर : प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 10/10/2026 रोजी पहाटे 05.00 वा.सुमारास रमेश छगन भोसले, रा.नागफनी, साईनाथनगर, ता.नेवासा हा त्याचे राहते घरी असताना आरोपी कल्याण भानुदास चव्हाण, कुणाल कल्याण चव्हाण, अभिषेक उर्फ अभी कल्याण चव्हाण व इतर 7 आरोपी अशांनी मिळून पोलीसांना माहिती देतो का असे म्हणून अभिषेक कल्याण चव्हाण याने बंदुकीने रमेश छगन भोसले याचे पाठीत गोळी मारली.तसेच कुणाल चव्हाण याने कोयत्याने, आकाश चव्हाण याने चाकुने, गणेश चव्हाण व उमेश भोसले यांनी कुऱ्हाडीने रमेश छगन भोसले याचे डोक्यावर, हातावर, पोटावर, पायावर वार केले.इतर आरोपीतांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली.याबाबत नेवासा पोलीस स्टेशन गुरनं 844/2026 बीएनएस कलम 109(1), 118(1), 115(2), 189(2), 190 सह आर्म ऍ़क्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
अग्निशस्त्राने फायर करून घडलेल्या गुन्हयांची प्राथमिक माहिती मिळताच मा.पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्हयाचे घटनाठिकाणी भेट देऊन, आरोपीतांचा शोध घेणेबाबत आदेश दिले.त्यानुषंगाने श्री.संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोउपनि/संदिप दरवडे व पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, अशोक लिपणे, आजिनाथ पाखरे, रोहित येमुल, बाळासाहेब खेडकर, रमीजराजा आत्तार, सागर ससाणे, प्रशांत राठोड व अरूण मोरे अशांचे पथक तयार करून गुन्हयातील आरोपीचा शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.  
  दिनांक 10/10/2026 रोजी पथक गोपनीय बातमीदार, तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना आरोपी उमेश हरिसिंग भोसले व त्याचा साथीदार हे वाळुंज, जि.छ.संभाजीनगर येथे असल्याची माहिती प्राप्त झाली.पथकाने वाळुंज परिसरात आरोपीचा शोध घेऊन 1) उमेश हरिसिंग भोसले, वय 28, रा.बाभुळखेडा, ता.नेवासा, जि.अहिल्यानगर 2) आकाश गौतम चव्हाण, वय 20, रा.इमामपूरवाडी, ता.पैठण, जि.छ.संभाजीनगर यांना ताब्यात घेतले.गुन्हयातील इतर आरोपीचा नेवासा परिसरात शोध घेत असताना 3) कुणाल कल्याण चव्हाण, वय 34, रा.जळके खु.ाा ता.नेवासा, जि.अहिल्यानगर हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांना गुन्हयाचे तपासकामी नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून, गुन्हयाचा पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
ताब्यातील आरोपी उमेश हरिसिंग भोसले हा सराईत आरोपी असून, त्याचेवर यापुर्वी खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन गुरनं व कलम
1 वाळुंज 415/2023 भादंविक 392
2 वाळुंज 451/2023 भादंविक 392
वरील कारवाई मा.श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे