गुन्हेगारी

कर्जत तालुक्यात घरफोडी व चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद आरोपीकडून 1 चोरी व 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 25 ऑक्टोबर : मा.पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने श्री संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी सपोनि/हरिष भोये व पोलीस अंमलदार अतुल लोटके, निळकंठ कारखेले, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सतीष भवर, सागर ससाणे, रोहित येमुल व भगवान धुळे याचे पथक तयार करुन कर्जत पोलीस स्टेशन हद्दीतील उघडकीस न आलेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्हयांचा समांतर तपास करणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले.
दिनांक 25/10/2026 रोजी तपास पथक गुन्हयाचा समांतर तपास करत असताना गोपनीय माहिती मिळाली की, कर्जत पोलीस स्टेशन गुरनं 580/2026 बीएनएस कलम 303 (2) चोरीचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी नामे अक्षय पवार, रा.बारडगाव दगडी, ता.कर्जत याने त्याचे साथीदारासह केला असून ते सध्या बारडगाव दगडी गावचे शिवारात आहेत.पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष नमूद ठिकाणी जाऊन आरोपीतांचा शोध घेऊन 1) अक्षय यादव पवार, वय 24, रा.बारडगाव दगडी, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर 2) शुभम कानिफनाथ पवार, वय 22, रा.भावडी, लोणी देवकर, ता.इंदापूर, जि.पुणे यांना ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपीस गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे वरील साथीदारासह 3) निखील सचिन भोसले, रा.चिलवडी, ता.कर्जत (फरार) याचेसह केल्याची माहिती दिली.आरोपीतांस अधिक विश्वासात घेऊन आणखी कोठे गुन्हे केले आहेत काय याबाबत विचारपूस केली असता त्याने वरील साथीदारासह चोरी केल्याच्या सांगीतलेल्या माहितीवरून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन गुरनं व कलम
1 कर्जत 580/2026 बीएनएस कलम 303 (2)
2 कर्जत 583/2026 बीएनएस कलम 331 (4), 305(अ)
3 कर्जत 584/2026 बीएनएस कलम 331 (4), 305(अ)
पथकाने गुन्हयाचे तपासात आरोपीकडून 9,95,000/- रू किं.त्यात पल्सर मोटार सायकल, मारूती सुझूकी कंपनीची इर्टिगा कार, दोन इन्व्हर्टर, पाच बॅटऱ्या असा मुद्देमाल जप्त केला.तसेच गुन्हयातील चोरीचा माल लपवून ठेवणारा 4) सचिन रमेश भोसले, वय 45, रा.चिलवडी, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेऊन त्याचेकडून 10,000/- रू किं.त्यात एक एचटीपी पंप असा एकुण 10,05,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.आरोपीस मुद्देमालासह कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले.
वरील कारवाई ही मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे