दखल
आंबेडकरी चळवळ पाठीशी आहे म्हणून मी नगरसेवक पदापर्यंत पोहोचलो, आमदार संग्राम भैय्या यांच्या माध्यमातून आपण सर्व मिळून संविधान भवनासाठी पाठपुरावा करू : नगरसेवक सुरेश बनसोडे


विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावनझालेल्या भुमी मध्ये म्हणजे चळवळीचे केंद्र असलेल्या पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळा , सिद्धार्थनगर येथे
आंबेडकरी समाज व चळवळीच्या वतीने अहिल्यानगर शहरातील सर्व सन्माननीय पदाधिकारी यांचा सन्मान सोहळा व वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी ते बोलत होते ते पुढे म्हणाले, बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आपण सर्व समाज बांधवानी दर रविवारी सिद्धार्थ गौतमबुद्ध पुतळ्याजवळ एकत्र आले पाहिजे असे ते म्हणाले,
यावेळी प्रामुख्याने स्वामी विवेकानंद विद्यालय चे मुख्ाध्यापक आयु.प्रा शरद मेढे सर , दादासाहेब रूपवते विद्यालय चे प्राचार्य प्रा प्रमोद सूर्यवंशी सर , यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार मिळाला त्याबद्दल तसेच माजी प्राचार्य प्रा. एल. बी. जाधव सर यांना धम्मरथ संयोजन समिती वतीने आदर्श बौद्ध कुटुंब पुरस्कार मिळाला त्याबद्दल तसेच बहुजन शिक्षण संघाचे रजिस्टर तथा माजी प्राचार्य प्रा. राजेंद्र एडके सर , ज्येष्ठ नेते प्रा. भीमराव पगारे सर , अरणगावचे उपसरपंच मयूर थोरात , पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेशराव भिंगारदिवे ,
आंबेडकरी चळवळी मधील युवा नेते अतुल सोनवणे , सेवानिवृत्त शिक्षिका सुजाताताई गायकवाड , पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते सुनील क्षेत्रे या सर्वांचा सत्कार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
व आंबेडकरी चळवळी मध्ये सर्व या आधीही सक्रिय होते व या नंतर ही सक्रिय राहणार असे सर्वांचे वतीने जाहीर करण्यात आले आणि समाजाच्या वतीने विविध ठराव यावेळी करण्यात आले .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे नगरसेवक युवानेते सुरेश भाऊ बनसोडे होते , कार्यक्रमाला प्रामुख्याने समाजाचे ज्येष्ठ नेते प्रा निवृत्ती आरु सर , प्रा जयंत गायकवाड सर , ज्येष्ठ मार्गदर्शक तथा माजी मुख्याध्यापक प्रा विलास साठे सर, सुनील क्षेत्रे , पत्रकार महेश भोसले,किरण दाभाडे , अमित काळे , प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा पंडित सर , राजरत्न खिल्लारे सर , गौतमीताई भिंगारदिवे , नितीन गायकवाड , विशाल कांबळे , भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष दिपकजी पाटोळे , आयु. पगारे सर , विशाल शेठ भिंगारदिवे , कौशल गायकवाड , किरण गायकवाड , विवेक विधाते ,आयु. क्षेत्रे सर , हेमाताई गायकवाड , ज्योती गायकवाड , प्रा. सतीश चाबुकस्वार , आयु. सोनटक्के सर , आयु. प्रा. शिंदे सर , आदर्श उघडे , अनिकेत विधाते आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी प्रस्ताविक आयु सिद्धार्थ आढाव सर यांनी केले , सूत्रसंचालन व संयोजन सुमेध गायकवाड यांनी केले. यावेळी सर्वांनी पुन्हा मोठ्या जोमाने आणि दमाने शहरात आंबेडकरी चळवळ गतिमान होणार आणि ती आपण सर्व मिळून करणार असल्याचा संकल्प केला.