देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 1 नोव्हेंबर : राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना नेहमीच विध्यार्थ्यांना शिकविन्या व्यतिरिक्त अवास्तव कामांचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढच्या पिढीचे भविष्य घडेल का? असा प्रश्न निर्माण झालाआहे.
प्राथमिक शिक्षकांना शासनाने अवास्तव कामे दिली आहेत. त्यामुळे विध्यार्थ्यांच्या अध्यापनाकडे दुर्लक्ष होत आहे. ही गोष्ट निश्चितच चिंतेची बाब असल्याचे मत देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्कचे संपादक सामाजिक कार्यकर्ते महेश भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. याबाबत शिक्षक संघटना व जिल्हा परिषद प्रथमिक शिक्षकांचा 4 नोव्हेंबर रोजी वाडिया पार्क ते अहिल्यानगर जिल्हा परिषद कार्यालय येथे भव्य मोर्चा निघणार असून या मोर्चास आपला पाठींबा असून याबाबत जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांची लवकरच भेट घेणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा