गुन्हेगारी

कारने येऊन घरफोडी करणारी जालना जिल्हयातील टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद टाकळी ढोकेश्वर येथील घरफोडीचा गुन्हा उघड – 17,40,000/- मुद्देमाल जप्त

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 2 नोव्हेंबर : प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 25/10/2026 रोजी दुपारी 01.10 वा.सुमारास यातील फिर्यादी श्रीमती मंगल संतोष गोरडे, रा.खिलारी वस्ती, टाकळी ढोकेश्वर, ता.पारनेर यांचे घराचे अनोळखी तीन आरोपीतांनी कुलूप तोडून घरातील 3,09,000/- रू किंमतीचे सोन्याचे दागीने चोरून नेले.याबाबत पारनेर पोलीस स्टेशन गु.र.नं. 840/2026 बीएनएस कलम 331 (3), 305प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
मा.पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने श्री संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी पोउपनि/कृष्णकुमार सेदवाड, अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार अतुल लोटके, निळकंठ कारखेले,फुरकान शेख, अभिजीत अरकल, भिमराज खर्से, सागर ससाणे, अमोल कोतकर, अमोल आजबे, प्रकाश मांडगे, भगवान सानप, बाळासाहेब खेडकर, प्रशांत राठोड, किरण ठुबे, अरूण मोरे व भगवान धुळे अशांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
दिनांक 01/11/2026 रोजी तपास पथक गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयाचा समांतर तपास करताना खात्रीशीर माहिती मिळाली की, नमूद गुन्हा हा कार्तिक प्रकाश आव्हाड, रा.उपजिल्हा रूग्णालय समोर, घनसांगवी, जि.जालना याने त्याचे साथीदारासह केला आहे.पथकाने मिळालेल्या माहितीवरून जालना जिल्हयात आरोपीचा शोध घेऊन 1) कार्तिक प्रकाश आव्हाड, वय 20, रा.उपजिल्हा रूग्णालयसमोर, घनसांगवी, जि.जालना यास ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार 2) गणेश प्रकाश आव्हाड 3) अर्जुन गणपत गायकवाड (फरार), अ.क्र.2 व 3 रा.उपजिल्हा रूग्णालयासमोर, घनसांगवी, जि.जालना 4) अभिषेक उर्फ अभि प्रकाश लोमटे, रा.कळंब,ता.कळंब, जि.धाराशिव 5) पुजा प्रकाश आव्हाड, रा.उपजिल्हा रूग्णालयासमोर, घनसांगवी, जि.जालना (फरार) 6) सुमित विनायक पांजगे, रा.मांगवाडा, घनसांगवी, जि.जालना (फरार) अशांनी मिळून डस्टर गाडी व पल्सर मोटार सायकलवर येऊन केल्याचे सांगीतले.आरोपीने सांगीतलेल्या माहितीवरून पथकाने आरोपीचा शोध घेऊन गणेश प्रकाश आव्हाड, वय 20, रा.उपजिल्हा रूग्णालयसमोर, घनसांगवी, जि.जालना व अभिषेक उर्फ अभि प्रकाश लोमटे, वय 21, रा. शेरेगल्ली, कळंब,ता.कळंब, जि.धाराशिव अशांना ताब्यात घेतले.
पथकाने गुन्हयाचे तपासात आरोपीतांनी गुन्हा करताना वापरलेली 8,00,000/- रू किं.रेनॉल्ट कंपनीची डस्टर कार, 1,00,000/- रू किं.त्यात एक पल्सर मोटार सायकल व 8,40,000/- रू किं.त्यात 60 ग्रॅम वजनाचे सोने असा एकुण 17,40,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह पारनेर पोलीस स्टेशन येथे हजर केले असून, गुन्हयाचा पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
वरील कारवाई ही मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे