साहित्यिक
१७ व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे यांची निवड

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर दि. 10 मे – शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने येत्या २३ व २४ मे रोजी आयोजित राज्यस्तरीय १७ व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ बनसोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
ही निवड आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. यावेळी शब्दगंध परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, सचिव सुनील गोसावी, खजिनदार भगवान राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. संदीप सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य संमेलन जाधव लॉन्स, कल्याण रोड, अहिल्यानगर येथे संपन्न होणार आहे.
सुरेश बनसोडे हे शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारसरणीशी निष्ठा राखणारे सक्रिय व धडाडीचे नेतृत्व म्हणून ओळखले जातात.आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माळीवाडा येथे उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला आहे. विविध महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्ताने साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातही त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग असतो.
स्वागताध्यक्ष निवडीसाठी आयोजित बैठकीस राज्य कार्यकारणी सदस्य सुभाष सोनवणे, प्रा. डॉ. तुकाराम गोंदकर, प्रा. डॉ. अनिल गर्जे, बबनराव गिरी, प्रशांत सूर्यवंशी, मकरंद घोडके, बाळासाहेब देशमुख, प्रा. हर्षल आगळे, प्रा. एल.बी. जाधव, शर्मिला गोसावी, स्वाती ठुबे, सुरेखा घोलप, विशाल तागड, दत्तू साळवे आदी उपस्थित होते.
निवडीबद्दल नगरसेवक सुरेश बनसोडे यांचा शब्दगंधचे कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, स्मरणिका व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सुरेश बनसोडे यांनी, “१७ वे शब्दगंध साहित्य संमेलन दिमाखदार पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असून, मान्यवरांसह नवोदित साहित्यिकांना सहभागी करून हे संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जातील,” अशी ग्वाही दिली.
बैठकीचे प्रास्ताविक सुभाष सोनवणे यांनी केले, भगवान राऊत यांनी परिचय करून दिला, तर शेवटी प्रा. डॉ. अनिल गर्जे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव स्वाती ठुबे यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माळीवाडा येथे उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला आहे. विविध महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्ताने साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातही त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग असतो.

