साहित्यिक

स्व . अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ १७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्व. अरुणकाका साहित्य नगरीची तयारी पूर्ण : स्वागत अध्यक्ष सुरेश बनसोडे

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 19 मे (प्रतिनिधी)- शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या स्व. अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ १७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन स्व. अरुणकाका साहित्य नगरीचे उद्घाटन २३ मे रोजी सकाळी १० वा. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण व कृषी मंत्री दत्तात्रय विठ्ठल उर्फ दत्ता मामा भरणे यांच्या शुभहस्ते हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्रामभैय्या जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंतराव डांगे, स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे, १६ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष संपतदादा बारस्कर, १६ वे संमेलनाध्यक्ष डॉ.संजीवनीताई तडेगावकर, माजी संमेलनाध्यक्ष व माजी आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर व संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ. संदीप सांगळे हे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक तथा स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे व शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी यांनी दिली.
उद्घाटनापूर्वी महापुरुषांना अभिवादन करून शाहिरी जलसा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यामध्ये शाहीर कल्याण काळे, भारुड सम्राट हमीद सय्यद, शाहीर भारत गाडेकर, वसंत डंबाळे, डॉ.शेषराव पठाडे, प्रशांत सूर्यवंशी, दिगंबर गोंधळी, हौसीनाथ बोर्डे व शब्दगंधची टीम सहभागी होणार आहे. दुपारी २ वाजता आधुनिक साहित्यातील स्त्री जीवनाचे चित्रण या विषयावर निलिमाताई बंडेलु यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून यामध्ये संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्त्यां निलीमा क्षत्रिय, मॅक्सवुमन मुंबईच्या संपादिका प्रियदर्शनी हिंगे सहभागी होणार आहेत.
दुपारी ३ ते ५ कवयित्री माधुरीताई मरकड यांच्या अध्यक्षतेखाली खुले काव्य संमेलन (कवी कट्टा) होणार असून यावेळी दंगलकार नितीन चंदनशिवे, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, प्राचार्य चंद्रकांत भोसले, प्रा.शशिकांत शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दुपारी ५ वाजता ” बदलते ग्रामीण जीवन आणि ग्राम संस्कृती ” या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजय कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून यामध्ये प्राचार्य डॉ.संजय नगरकर, लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके,साथी शिवाजी नाईकवाडी, प्रा.डॉ.गणेश मोहिते सहभागी होणार आहेत.
सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे चे कोषाध्यक्ष,गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या अध्यक्षतेखाली गझल काव्य संमेलन होणार असून यामध्ये माधव सावंत, हनुमंत येवले, संजय पठाडे, रज्जाक शेख ,साहेबराव घुले, सरिता कलडोणे, प्रशांत वाघ, विक्रम कांबळे, राम गायकवाड, बबन धुमाळ, इकबाल काकर, बाळासाहेब गिरी, अरुण कटारिया, धनंजय तांदळे, सुहास घुमरे, हुमायून आतार, अजय त्रिभुवन, कुणाल शिरोडे, राजू आठवले, अंजली दीक्षित सहभागी होणार आहेत.
रविवारी सकाळी ९/३० वा.कथा व काव्य लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रा.डॉ.संजय पाईकराव, संदीप रोहकले यांच्या हस्ते होणार असून प्राचार्य डॉ.अशोकराव ढगे,प्राचार्य बाळासाहेब सागडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय कार्यवाह जयंत येलूलकर, अभिनव खानदेश चे संपादक प्रभाकर सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते पुस्तक प्रकाशन होणार आहेत. प्रारब्ध – सौ.एस.एम. मिर्झा, अंतरी – सुरेखा घोलप, माणसं असे अन तसेही – बाळासाहेब देशमुख, निशब्द भावना – विनय पिंपरकर इत्यादी पुस्तकाचे प्रकाशन यावेळी होणार आहे.
सकाळी १०/३० वा.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य कविवर्य प्रकाश होळकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रिताचे काव्य संमेलन होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आठव्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कविवर्य प्रकाश घोडके, हनुमंत चांदगुडे उपस्थित राहणार आहेत.या काव्य संमेलनात बाळ पाटील, चंद्रकांत कर्डक, भास्कर निर्मळ, दशरथ शिंदे, शारदा घोडके, डॉ.कैलास दौंड, अर्जुन देशमुख, शुभांगी राऊतमारे, लक्ष्मण खेडकर, वर्षा चौबे, डॉ.स्वाती पाटील, वसंत मुरदारे, अशोक निंबाळकर, माधुरी चौधरी, डॉ.प्रवीण जाधव, प्रवीण घुले, संदीप राठोड, नागेश शेलार, स्नेहल डाडर, नवनाथ केंदळे, अनिल कुमार होळकर, रिता जाधव इत्यादी महाराष्ट्रातील कवी यामध्ये सहभागी होणार आहेत.
दुपारी २ वा. असा मी घडलो… हे चर्चासत्र बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यामध्ये पद्मश्री राहीबाई पोपेरे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी रेवणनाथ कानडे, साई एशियन हॉस्पिटलचे संचालक डॉ.सचिन पांडुळे इत्यादी सहभागी होणार आहेत.
दुपारी तीन वाजता ग्रंथविक्रेत्यामुळे वाचन चळवळीला पाठबळ मिळते का या विषयावर चर्चासत्र होणार असून यामध्ये लेखक प्रकाशक वाचक साहित्यिक ग्रंथ विक्रेते सहभागी होणार आहेत.
रविवारी दुपारी ४ वा.१७ व्या शब्दगंध संमेलनाचे पारितोषिक वितरण व समारोप अहिल्यानगर चे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार असून यावेळी माजी आमदार कविवर्य लहू कानडे, पाथर्डी नगर परिषदेचे नगराध्यक्ष अभयराव आव्हाड,सीएसआडीचे प्राचार्य डॉ. सुरेश पठारे, प्राचार्य शिवाजीराव देवढे, बापूसाहेब भोसले, कॉ. बाबा आरगडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनात प्रा.डॉ.गणी पटेल, छत्रपती संभाजीनगर व आयु. अशोकराव गायकवाड, अहिल्यानगर यांना शब्दगंध जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून मातोश्री यमुनाबाई पांडुळे स्मृती पुरस्कार ॲड रंजनाताई गवांदे यांना देण्यात येणार आहे.तसेच विविध साहित्य कृतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.आत्तापर्यंत झालेल्या शब्दगंध संमेलनाध्यक्षांची भाषणे ” शब्दसंचित ” या सुनील गोसावी संपादित ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
१७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनातील सर्व कार्यक्रमांसाठी साहित्यिक व साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक तथा स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे,शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे,संयोजन समिती सदस्य संजय खामकर,परिमल निकम,जयंत गायकवाड, भगवान राऊत, डॉ.अशोक कानडे, भारत गाडेकर, जयश्री झरेकर, प्रा.डॉ. तुकाराम गोंदकर, राजेंद्र फंड, प्रा.डॉ. अनिल गर्जे,स्वाती ठुबे, बबनराव गिरी,सुभाष सोनवणे, हर्षल आगळे, मकरंद घोडके, शर्मिला गोसावी, राजेंद्र पवार, रवींद्र दानापुरे, प्रशांत सूर्यवंशी व राजेंद्र चोभे यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे