देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क अहिल्यानगर, दि. 5 जुलै : श्रीगोंदा पोलीस स्टेशन मधील गुन्ह्यातील आरोपी व साक्षीदार यांना माननीय श्रीगोंदा न्यायालयाने न्यायालयीन साक्ष करता वारंवार काढलेले समन्स/जामीनपात्र वाॅरंट श्रीगोंदा पोलीस ठाण्यामार्फत बजावूनही सदर आरोपी/साक्षीदार/फिर्यादी हे न्यायालयीन साक्ष कामी हजर न राहिल्याकारणाने मा.न्यायालयाने काढलेल्या एन.बी.डब्ल्यू वॉरंट मध्ये खालील विविध 07 आरोपींना अटक करुन विविध न्यायालयात हजर करण्यात आले. पैकी बऱ्याच आरोपींची मा न्यायालयानी कारागृहात रवानगी केली .
श्रीगोंदा पोलीस ठाणे मार्फत
नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की न्यायालयाने काढलेल्या समन्सला दिलेल्या तारीख व वेळी माननीय न्यायालयात आपण हजर राहावे जेणेकरून जामिन पात्र वारंट निघणार नाही, अनावधानाने एखाद्या तारखेला हजर न राहिल्यास जामीन पात्र वारंट निघाल्यास त्यावेळी निश्चित मा न्यायालयात हजर राहावे जेणेकरून आपणावर अटकेची नामुष्की येणार नाही. व जेल वारी करावी लागणार नाही.
अटक करण्यात आलेली इसमांची नावे खालील प्रमाणे.
1. अक्षय बाळू शिंदे, रा. बावडी, ता.श्रीगोंदा – मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीगोंदा
2. सागर विठ्ठल जाधव, रा. कैकाडी गल्ली श्रीगोंदा, ता.श्रीगोंदा
3. बाळू कुंडलिक जगदाळे, रा. आढळगाव, ता.श्रीगोंदा
4. फिरोज हमीद इनामदार, रा. इनामदार वस्ती घोडेगाव रोड, श्रीगोंदा ता.श्रीगोंदा
5. महादेव पोपट मोटे, रा. मखरेवाडी श्रीगोंदा ता.श्रीगोंदा
6. बाबल्या शंकर काळे राहणार शेडगाव ता श्रीगोंदा
7. नामदेव बापूराव सावंत, रा. चिखलठाणवाडी ता श्रीगोंदा
पैकी 02 आरोपींना मा न्यायालयाने मॅजिस्ट्रियल कस्टडी रिमांड देऊन जेल मधे ठेवण्याचे आदेश दिले.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन सो यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत मा. अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुजीतकुमार क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे नेतृत्वात सपोनि.गणेश अहिरे,
पो.उप.निरी.सचिन लिमकर, पो.उप.निरी.मनोहर खिळदकर, पो.उप.निरी.पवन मोहिते, पो.उप.निरी.भगवान गांगर्डे, पोहेकाॅ.गुलाब मोरे, पोहेकाॅ. संभाजी शिंदे, पोहेकाॅ.अभय काळे, पोहेकाॅ.दिंडे, मपोहेकाॅ. जमुना बजंगे, पोहेकाॅ.संभाजी वाबळे, पोना.गहिनीनाथ यादव, पोकाॅ. राहुल मोढळे, पोकाॅ.आनंद मैड, पोकाॅ.संदीप राऊत, पोकाॅ. विवेक दळवी, पोकाॅ.राहुल शिंदे, पोकाॅ. अमोल मरकड, पोकाॅ.अरुण पवार, मपोकाॅ. राणी व्यवहारे, पोकाॅ. मयूर तोरडमल, पोकाॅ.पळसे,पोकाॅ.महादेव कोहक,पोकाॅ.सचिन वारे, पोकाॅ. रवी जाधव, पोहेकाॅ.नरुटे, मपोकाॅ.लाड, चापोकाॅ.साळवे ,मपोहेकाॅ.कुरुळे, पोकाॅ.संभाजी गर्जे, पोकाॅ.अविनाश कराळे, पोकाॅ.मानसिंग काळे, पोकाॅ.वैजिनाथ कुटे पोकाॅ.सचिन गोरे यांनी केली.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा