गुन्हेगारी

घोडेगाव गोळीबारातुन झालेल्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये फुलमाळी टोळीतील 01 आरोपी पुणे जिल्ह्यातुन ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि : 5 जुलै : प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, घोडेगाव जनावरांच्या कर पावतीचा लिलाव दिड वर्षापासुन फिर्यादीचे यांनी घेतलेला होता.यापुर्वी सदरचा लिलाव कृष्णा यल्लपा फुलमाळी व त्याचा भाऊ भारत यल्लपा फुलमाळी दोघे रा. घोडेगाव ता.नेवासा यांच्याकडे होता. सदर लिलावचे कारणावरुन फिर्यादीचे पती व आरोपी यांचेमध्ये यापुर्वी वाद झालेले होते. दिनांक 12/02/2026 रोजी मयत नितीन विलास शिरसाठ हे घोडेगाव याठिकाणी हॉस्पिटलमध्ये गेले असतांना त्याचेवर गुलाब सादिक फुलमाळी व इतरांनी गावठी कट्यातुन फायर करुन त्यास जिवे ठार मारलेले आहे. सदर घटनेबाबत सोनई पोलीस स्टेशन गु.र.नं.50/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 189(2), 191(2), 191(3) सह आर्म ऍ़क्ट कलम 3/25 वगैरे प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्यात यापुर्वी आरोपी 1) गुलाब सादिक फुलमाळी, 2) सुरज फुलमाळी, 3) आकाश आण्णा फुलमाळी यांना यापुर्वी अटक करण्यात आले असुन आरोपी गणेश कारभारी साबळे हा गुन्हा घडले पासुन फरार झाले होता.
मा. श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन सदर गुन्ह्यातील आरोपी तात्काळ अटक करणे बाबत स्थानिक गुन्हे शाखेस आदेश दिलेले होते.
नमुद आदेशानुसार पो.नि. श्री संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा,अहिल्यानगर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/ संदिप दरवडे, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, फुरकान शेख, शाहिद शेख, बाळासाहेब नागरगोजे, योगेश कर्डीले, प्रशांत राठोड, चालक अरुण मोरे, यांचे पथक तयार करुन गुन्ह्यातील आरोपीचे शोध घेवुन तात्काळ अटक करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केले.
वर नमुद पथक 07 दिवसापासुन गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचे मागावर होते. पथकाने आरोपींची माहिती संकलित करुन व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती काढत असतांना पथकास दिनांक 03/07/2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत सदर गुन्ह्यातील आरोपी गणेश साबळे हा वाकड, जि. पुणे येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ वाकड, जि. पुणे येथे जावुन आरोपीचा शोध घेत असतांना एक इसम संशयीतरित्या फिरतांना दिसुन आला. त्यास ताब्यात घेवुन त्याचे नांव पत्ता विचारता त्याने त्याचे नांव गणेश कारभारी साबळे वय – 37 वर्षे रा. पानसवाडी ता. नेवासा जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे सदर गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदारासह केल्याची कबुली दिली आहे.
ताब्यातील आरोपी हा कृष्णा फुलमाळी टोळीमधील आरोपी असुन कृष्णा फुलमाळी टोळीविरुध्द यापुर्वी अनेक गुन्हे दाखल आहे.
ताब्यातील आरोपी गणेश कारभारी साबळे वय-37 वर्षे रा. पानसवाडी ता.नेवासा जि.अहिल्यानगर यास नमुद गुन्ह्याचे तपासकामी सोनई पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलेला असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव विभाग हे करित आहेत.
सदरची कारवाई श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री निरज राजगुरु, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे