कौतुकास्पद
तरुणीचा पाठलाग करुन विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या 12 तासांत पोलिसांनी आवळल्या मुसक्या! स्थानिक गुन्हे शाखेची तत्पर कारवाई!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : दिनांक 20/05/2026 रोजी रात्री 09.00 ते 11.00 वा.चे सुमारास पिडीत हि मैत्रिणीला भेटुन ऍ़क्टिवा गाडीवर व्ही स्टार हॉटेल समोरील रोडवरुन घरी जात असतांना एक अनोळखी इसम त्याचे मोटार सायकलवरुन पाठलाग करुन हातवारे करुन व बोलुन लज्जा उत्पन होईल असे कृत्य केले होते. त्यावेळी सदर पिडीतेने तिचे सोबत घडत असलेल्या प्रकाराचा तिच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ तयार केला होता. सदर घटनेबाबत पिडीतेने सदरचा व्हिडीओ इस्टग्रामवर व्हायरल करुन व्हिडोओ मधील इसमास कोणी ओळखत असेल तर त्याचे नाव कळावा असा मेसेज केला होता.
मा. पोलीस अधीक्षक साहेब अहिल्यानगर यांनी सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन सदर व्हिडीओ मधील इसमास तात्काळ ताब्यात घेणे बाबत, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना आदेशित केले होते. नमुद आदेशान्वये पो.नि. स्थानिक गुन्हे शाखा, अहिलायनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन सदर व्हिडीओ मधील इसमास तात्काळ ताब्यात घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केले होते.
पथकाने अहिल्यानगर शहरात व्हिडीओ मधील आरोपीचे व्यवसाय कौशल्य व गुप्त बातमीदारामार्फत सदर इसमचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव बंटी उर्फ संकेत ससाणे रा. सिध्दार्थनगर अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.
वरील घटने प्रमाणे ताब्यातील इसमाने अजुन एक घटना केल्याची तक्रार प्राप्त झाल्याने सदर दोन्ही घटनेबाबत ताब्यातील इसमाविरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 377, 378/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 78,79 प्रमाणे दोन गुन्हे दाखल केले आहे. आरोपीस पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर ú केले असुन पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे करीत आहे.
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल महिलांच्या सुरक्षेबाबत “झिरो टॉलरन्स” धोरण राबवत आहे. महिलांनी अशा घटनांची माहिती तत्काळ 112 या नंबर फोन करुन माहिती द्यावी. असे आवाहन करण्यात येत आहे.



