कौतुकास्पद
अहिल्यानगर जिल्ह्यातुन हद्दपार केलेला एकजण चिंचपुर ता. पाथर्डी येथुन जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची दबंग कारवाई!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क अहिल्यानगर, दि. 22 मे : मा. श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे आदेशान्वये पोनि/श्री. किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सुरेश माळी, सुयोग सुपेकर, रोहित येमुल, सागर ससाणे यांचे पथक तयार करुन अहिल्यानगर जिल्ह्यातुन हद्दपार केलेल्या आरोपींची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
दिनांक 21/05/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्हयातील हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांचा पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शोध घेत असतांना पथकास गुप्तबातमीदारामार्फत हद्दपार इसम सोनु उर्फ वैभव राजेंद्र बोरुडे रा.चिंचपुर ता. पाथर्डी हा हद्दपार आदेशाचा भंग करुन विनापरवाना चिंचपुर येथे घरी असल्याची माहिती प्राप्त झाली.
सदर माहितीचे आधारे पथकाने बातमीतील इसमांचे चिंचपुर ता पाथर्डी येथे जावुन शोध घेता एक इसम मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे पुर्ण नांव गांव विचारता त्याने त्यांचे नांव सोनु उर्फ वैभव राजेंद्र बोरुडे वय-30 वर्षे रा. चिंचपुर ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.ताब्यातील इसमाचे हद्दपार अभिलेखाची खात्री करता त्याला दिनांक 05/12/2025 पासुन 02 वर्षाकरिता अहिल्यानगर जिल्ह्यामधुन हद्दपार केलेले आहे.
ताब्यातील इसमाविरुध्द पोकॉ/902 सागर अशोक ससाणे नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पाथर्डी पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातुन हद्दपार केलेले इसम विनापरवाना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वास्तव्य करत असल्याचे दिसुन आल्यास स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथील फोन नंबर 0241-2416111, डायल 112 यावर कळविणे बाबत आवाहन करण्यात येत आहे.
ताब्यातील इसमाचे हद्दपार अभिलेखाची खात्री करता त्याला दिनांक 05/12/2025 पासुन 02 वर्षाकरिता अहिल्यानगर जिल्ह्यामधुन हद्दपार केलेले आहे.


