देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 7 जुलै : मा. श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे आदेशान्वये पोनि/श्री. संतोष मुटकुळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/ अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार विष्णु भागवत, सुनिल पवार, शाहिद शेख, विशाल तनपुरे, चालक महादेव भांड यांचे पथक तयार करुन अवैध वाळु उपसा व वाहतुक करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेकामी रवाना केले.
दिनांक 05/07/2026 रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पारनेर पोलीस स्टेशन हद्दीमध्येे पेट्रोलिंग करुन अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत मांडओहोळ फाटा ते गुरेवाडी जाणारे रोडने कर्जुले हर्या ता. पारनेर येथे एक पांढ-या रंगाचा हायवा अवैधरित्या वाळुची चोरटी वाहतुक करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने मांडओहोळ फाटा ते गुरेवाडी जाणारे रोडवर कर्जुले हर्या शिवारात जावुन सापळा लावुन थांबले असता. गुरेवाडीकडुन मांडओहोळ फाटाचे दिशेने एक हायवा येतांना दिसुन आले. तेव्हा पथकाने सदर हायवा गाडी थांबवुन चालकास ताब्यात घेवुन त्याचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव 1) नवनाथ शिवाजी काळे वय-28 वर्षे रा. जांभळवाडी, खडकवाडी, ता. पारनेर जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्यास ताब्यातील हायवा गाडीचे मालकी बाबत विचारपुस करता त्याने हायवा गाडी 2) राहुल जाधव पुर्ण नांव माहित नाही रा. टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर (फरार) याचे असल्याचे सांगितले.
आरोपीचे कब्जातुन 40,000/- रु किमंतीची 4 ब्रास वाळु, 15,00,000/-रु किमतीची एक टाटा कंपनीची हायवा, असा एकुण 15,40,000/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
ताब्यातील आरोपीविरुध्द पारनेर पोलीस ठाणे गु.र.नं.523/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पारनेर पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कारवाई श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा