देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 20 सप्टेंबर : मा.श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यामधील अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने पोनि/श्री संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोउपनि/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार राहुल द्वारके, संदिप पवार, विजय ठोंबरे, शाहीद शेख, गणेश लोंढे, अभिजीत अरकल व रोहित मिसाळ अशांचे पथक तयार करून जिल्हयातील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथकास रवाना केले.
दिनांक 19/09/2026 रोजी तपास पथक भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की, मुकूंदनगर परिसरात मुल्ला कॉलनी येथील एका घरामध्ये काही इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करून, गोमांस विक्री करत आहे.पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली असता दोन इसम मांसाचे तुकडे करताना दिसल्याने छापा टाकुन 1) तन्वीर सत्तार कुरेशी, वय 46, रा.सुभेदार गल्ली, झेंडीगेट, अहिल्यानगर 2) एजाज जानमोहमंद कुरेशी, वय 52, रा.जुने कलेक्टर कार्यालयाजवळ, झेंडीगेट, अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.आरोपीचे कब्जातून 56,500/- रू किं.त्यात 70 किलो गोमांस, दोन वजन काटे, चाकु, सत्तुर व दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला.ताब्यातील आरोपीकडे घराचे मालकीबाबत व जप्त मुद्देमालाबाबत विचारपूस करता त्यांनी नमूद घर हे 3) सालीम शब्बीर कुरेशी, रा.सुभेदार गल्ली, झेंडीगेट, अहिल्यानगर (फरार) याचे मालकीचे असून त्याचे सांगणेवरून गोमांसची विक्री करत असल्याची माहिती सांगीतली.
आरोपीविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गु.र.नं. 485/2026 बीएनएस कलम 271, 325, 3(5) महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारित 2015 चे कलम 5 (क), 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.
वरील कारवाई मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा