धार्मिक

नारायण गव्हाण येथे ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : नारायण गव्हाण (ता. पारनेर)दि. 20 सप्टेंबर – येथील काशी आई माता तरुण मित्र मंडळाच्या वतीने गणेश उत्सव निमित्त आयोजित भव्य ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे सौजन्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेर तालुका अध्यक्ष श्री. अविनाश पवार यांनी केले होते, तर बक्षीस सौजन्य शिवसेना युवा नेते श्री. अजिंक्यतारा दरेकर यांनी केले होते.
यावेळी विद्यमान सरपंच श्री. राजेश शेळके यांनी प्रत्येक विजेत्या महिलेस दोन हजार रुपये रोख बक्षीस दिले, त्यामुळे महिलांमध्ये अधिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेर तालुका सचिव श्री. नारायण नरवडे, मनसे सुपा शहर अध्यक्ष श्री. अक्षय सूर्यवंशी, तसेच कामगार नेते श्री. कल्याण शेठ शहाणे नारायण गव्हाण शाखा अध्यक्ष सुरज गोरे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना मिक्सर, फॅन, इस्त्री व रोख रक्कम असे बक्षीस वितरण करण्यात आले.
महाप्रसादाचे सौजन्य अनुसया पंढरीनाथ खोले, लक्ष्मण पंढरीनाथ खोले व नारायण पंढरीनाथ खोले परिवाराने केले होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे