धार्मिक
महाबोधी महाविहार मुक्तीसाठी राजकारणा पलीकडे जाऊन सर्वपक्षीय बौद्ध नेत्यांची एकजूट बिहार मध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असो महाबोधी महाविहार प्रश्नी बौद्धांना न्याय मिळालाच पाहिजे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले बौद्ध आंबेडकरी जनतेचे आझाद मैदानात रखरखत्या उन्हात विराट शक्तिप्रदर्शन

मी मंत्री असलो तरी आंबेडकरी कार्यकर्ता आहे.त्यामुळे मंत्री असलो तरी मी नामंतरासाठी मोर्चे काढले होते आता महाबोधी महाविहार मुक्ती साठी मोर्चा काढला आहे.बिहार मध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असो महाबोधी महाविहार प्रश्नावर बौद्धांना न्याय द्यावाच लागेल.बी टी ऍक्ट रद्द करून महाबोधी महाविहार चे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती द्यावेच लागेल असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.





