देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर: दि. 3 सप्टेंबर: ऍड: युवराज शिंदे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असून गोरगरीब लोकांचे ते आशीर्वाद घेत असल्याचे मत रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष तथा साईराम सोसायटीचे चेअरमन सुनील शिंदे यांनी व्यक्त केले.
नगर कल्याण रस्त्यावरील अनुसयानगर अनुसया नगरचा राजा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित गणपती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष, प्रमुख मार्गदर्शक ऍड. युवराज शिंदे, दत्तात्रय पारखे, श्रीपाद वाघमारे, संपादक महेश भोसले, कुंडलिकराव आरोडे, मच्छिन्द्र चौकटे महाराज, लक्ष्मण खोडदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुनील शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरानी ऍड. शिंदे यांच्या सामाजिक कार्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंडळाच्या वतीने आयोजित लकी ड्रॉ मध्ये परिसरातील रहिवासी आरती राम नक्का या सायकल जिंकणाऱ्या भाग्यवान विजेत्या ठरल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना सायकलचे वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण खोडदे यांनी केले. तर कार्यक्रमाला मान्यवरानी उपस्थिती दर्शविल्याबद्दल ऍड. युवराज शिंदे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.