सामाजिक

विदयुत महावितरण कंपनीच्या शिवम सिस्टीम एजन्सीवर कडक कारवाई करावी! चार ते पाच महिन्यात एकदा घेतले जाते रिडींग, ग्राहकांवर येतोय आर्थिक बोजा सामाजिक कार्यकर्ते महेश भोसले यांची मागणी

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 14 जुलै : विदयुत महावितरण कंपनीच्या शिवम सिस्टीम एजन्सीवर कडक कारवाई करण्यात यावी. या एजन्सी कडून चार ते पाच महिन्यात एकदाच मीटरचे रिडींग घेतले जाते. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक बोजाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते पत्रकार महेश भोसले यांनी नुकतेच विदयुत महावितरण कंपनीला पत्र दिले आहे. सदर पत्रात नगर शहरात तसेच ग्रामीण भागात प्रत्येक घरामध्ये महावितरण कंपनीचे मीटर बसविले असून मीटर चे रिडींग दर महिन्याला घेतले जात नाही. ते चार ते पाच महिन्यातून एकदाच घेतले जाते, त्यामुळे सरासरी अंदाजे बिल ग्राहकाला येते. यामुळे साहजिकच एकदाच मोठी बिलाची रक्कम येते.एकदाच मोठया बिलाची रक्कम आल्यामुळे सर्व सामान्य गरीब ग्राहकांना ती भरणे जिकरीचे होऊन जाते, त्यातच महावितरण कंपनीचे कर्मचारी वेळेवर बिल न भरल्यास विदयुत कनेक्शन कापण्यास तत्परच असतात, त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप होऊन आर्थिक हेळसांड होत असल्यामुळे सदर शिवम सिस्टीम एजन्सीवर कडक कारवाई करून या एजन्सीचा ठेकाच रद्द करावा. व ग्राहकांची होणारी हेळसांड थांबवावी असे म्हटले आहे. याबाबत महावितरणचे अति. कार्यकारी अभियंता सुभाष घाटोळ यांनी सदर एजन्सीवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. सदर पत्रावर माजी नगरसेवक आरपीआय आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, प्रा. जयंत गायकवाड, संजय ताकवले, सुजित घंगाळे, राजू भाऊ शिरसाठ, दयानंद साळवे, अमित टेंबरे, रवींद्र वाघचौरे, मंगेश मिसाळ, रुपेश भोसले, संदेश भोसले, दिपक भोसले , भीम साळवे, निखिल साळवे, मोहिनी भोसले, तृप्ती भोसले, सारिका जमधडे, अंबिका साळवे, सुशांत शिरसाठ, पुष्पा खंडागळे, सविता कांबळे, यश मकासरे, यश साळवे, सुनील पारधे, नितीन मंडलिक आदींच्या साह्या आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे