आरोग्य व शिक्षण
“तुमची मदत विद्यार्थाचे जीवन घडवू शकते”! आर्थिक दृष्ट्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत करा, दादासाहेब रुपवते विद्यालयाचे दानदाते, सेवाभावी ट्रस्टला आवाहन


अनेक विदयार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हालाकिची असल्यामुळे अपुऱ्या शालेय साहित्या अभावी त्यांना अर्ध्यावरच शिक्षण सोडावे लागत आहे. विद्यार्थ्यांनी शालेय साहित्या अभावी शिक्षण सोडून जावू नये. या हेतूने शहरातील बहुजन शिक्षण संचलित दादासाहेब रुपवते विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांनी सेवाभावी संस्था, ट्रस्ट, तसेच व्यक्तिगत दानदाते यांना 5 वी ते 12 पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना शालेय गणवेश, वह्या, पुस्तके, दप्तर तसेच इतर शालेय साहित्याची 2026- 2027 या शैक्षणिक वर्षाच्या कालावधीत जुलै महिना अखेर 2026 पर्यंत मदत करावी असे आवाहन प्राचार्य प्रमोद सूर्यवंशी, पर्यवेक्षक प्रा. जयंत गायकवाड तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांनी केले आहे.