देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 11 जुलै : प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 22/03/2026 रोजी सायंकाळी 06.00 वा.चे सुमारास फिर्यादी त्याचे स्विप्ट कार मधुन बीफ मार्केट येथे जात असतांना आरोपी सर्फराज बाबा शेख, इरफान मोईनुद्दीन शेख उर्फ इप्प्या, लुकमान इसाक शहा, राहुल भिमा सोनवणे व अझर शेख अशांनी फिर्यादीच्या कार आडवुन त्याचेकडुन 50 हजार रुपयांची खंडणीची मागणी केली. तेव्हा फिर्यादी त्यांना पैसे देण्यासाठी नकार दिला असता आरोपीनी फिर्यादीस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या हातातील कोयत्याने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन केले आहे. सदर घटनेबाबत श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.208/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 115(2), 126(2), 189(2), 189(4), 190, 191(2), 191(3), 308(2), 351(2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
पो.नि. श्री संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/ संदिप दरवडे, पोलीस अंमलदार फुरकान शेख, रमीजराजा आतार, प्रकाश मांडगे, सुनिल मालनकर, मनोज मोहन साखरे, प्रशांत राठोड, यांचे पथक तयार करुन त्यांना सदर गुन्ह्यातील तात्काळ अटक करणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केले.
वर नमुद पथकाने वरील गुन्ह्यातील आरोपींची माहिती संकलित करुन व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती काढत असतांना पथकास दिनांक 11/07/2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अजहर युसुफ शेख हा त्याचे राहते घरी असल्याची माहिती मिळाली. पथकाने आरोपीचे राहते घरी जावुन शोध घेतला असता तो मिळुन आल्याने ताब्यात घेवुन त्यास नांव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव अजहर युसुफ शेख वय-22 वर्षे रा. वार्ड नं.01 संजयनगर, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे सदर गुन्ह्याचे अनुषंगाने विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदारासह केला असल्याचे सांगितले आहे.
ताब्यातील आरोपी वरील गुन्ह्याचे तपासकामी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा