न्यायालयीन

ॲड .ए के डोखे यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे संघटित गुन्हेगारी (मोक्का) प्रकरणातील मुख्य आरोपीस जामीन मंजूर

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 8 जुलै, (प्रतिनिधी) : तोफखाना नगर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं. 224/2026 अंतर्गत मधील कलमे 111, 309(6), 308(2), 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 119(1), 324(2), 3(5) तसेच मधील कलमे 25 व 4 अन्वये नोंद करण्यात आलेल्या आणि संघटित गुन्हेगारी (मोक्का) अंतर्गत कारवाई झालेल्या गाजलेल्या प्रकरणात मुख्य आरोपीस न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणात पाडळे टोळीविरुद्ध संघटित गुन्हेगारीच्या तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली होती. जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान ॲड. ए. के. डोखे यांनी न्यायालयासमोर प्रभावी व सखोल कायदेशीर युक्तिवाद मांडला. त्यांच्या युक्तिवादाची दखल घेत न्यायालयाने मुख्य आरोपीस जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला.
या प्रकरणात ॲड ए. के. डोखे यांच्यासमवेत ॲड. कुमार भिंगारे यांनीही कामकाजात सक्रिय सहभाग घेतला. न्यायालयाच्या आदेशानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित आरोपीची तुरुंगातून मुक्तता होणार आहे.
या जामीन आदेशामुळे सदर प्रकरणाची कायदेवर्तुळात चर्चा सुरू असून, बचाव पक्षाच्या प्रभावी मांडणीची दखल घेतली जात आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे