न्यायालयीन

लोखंडी हातोडा व विटेने हल्ला करणाऱ्या आरोपींना 03 वर्षे कारावासाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट, श्रीरामपुर यांचा आदेश

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क अहिल्यानगर : दि. 8 मे : श्रीरामपुर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 140/2022 भारतीय दंड विधान संहिता कलम 324, 323, 504, 506, 427 प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी नामे नवनाथ अशोक जाधव यास आरोपी 1) शिवाजी शंकर वने, 2) शंकर बाबुराव वने, 3) चैतन्य दिलीप वने सर्व रा. भेर्डापुर, ता. श्रीरामपुर जि. अहिल्यानगर यांनी मागील वादाचे कारणावरुन इंडियन ऑईल पेट्रोलपंप भेर्डापुर, ता. श्रीरामपुर येथे लोखडी हातोडा व विटाने मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी दिलेली होती.
वर नमुद गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे तपासी अंमलदार सफौ. अर्जुन भैरु बाबर नेम – श्रीरामपुर तालुका पोलीस ठाणे यांनी गुन्ह्याचा तपास करुन वस्तुजन्य, भौतिक पुरावे संकलित करुन गुन्ह्यामध्ये भक्कम पुरावा गोळा केला. गुन्ह्याचे तपासाअंती मा. प्रथमवर्ग न्यायंदडाधिकारी कोर्ट, श्रीरामपुर यांचे न्यायालयामध्ये आरोपीविरुध्द आर.सी.सी. नं. 471/2022 अन्वये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
मा. न्यायालयाने सदर खटल्यामध्ये फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकिय अधिकारी व तपासी अंमलदार यांच्या साक्ष नोंदवुन घेवुन दिनांक 04/05/2026 रोजी आरोपी नामे 1) शिवाजी शंकर वने, 2) शंकर बाबुराव वने, 3) चैतन्य दिलीप वने सर्व रा. भेर्डापुर, ता. श्रीरामपुर जि. अहिल्यानगर यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 324, 323, 504, 506, 427 अन्वये दोषी ठरवुन त्यांना मा. विजया काटकर, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीरामपुर यांनी 03 वर्षे कारावासाची व 75,000/- दंडाची, तसेच सदर दंड न भरल्यास 01 वर्षे अतिरीक्त कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे. सदर केस मध्ये सरकारपक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री धुमाळ व कोर्ट पैरवी अधिकारी श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन यांनी कामकाज पाहिलेले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे