कौतुकास्पद
अहिल्यानगरचे नाव पाहचले परदेशात अहिल्यानगरच्या शिरपेच्यात मानाचा तुरा! पेमराज सारडा महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी महाविद्यालयाचा अभिमान कृष्णा संतराम शिंदे यांची युरोपमधील LUT University मध्ये Ph.D. साठी निवड!



शैक्षणिक प्रगती, संशोधनाची आवड आणि करिअरविषयक दिशा यांसह विविध बाबींमध्ये त्यांनी कृष्णा यांना मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनामुळेच कृष्णा यांची संशोधन क्षेत्रातील आवड अधिक दृढ झाली.त्यानंतर त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मधून भौतिक रसायनशास्त्र (Physical Chemistry) या विषयात M.Sc. पूर्ण केले. त्यांच्या पदव्युत्तर शिक्षणाचा केंद्रबिंदू फंक्शनल पॉलिमर्स आणि अॅडव्हान्स्ड मटेरियल्स हा होता.शिक्षणादरम्यान त्यांनी स्पेक्ट्रोस्कोपी, इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि सॉलिड स्टेट केमिस्ट्री या विषयांमध्ये भक्कम पायाभूत ज्ञान संपादन केले. त्यांचा संशोधन प्रबंध फंक्शनल पॉलिमर्सवर आधारित असून, त्यांनी मॉलिक्युलरली इम्प्रिंटेड पॉलिमर्स (Molecularly Imprinted Polymers) या विषयावर विशेषतः सिलेक्टिव्ह रिकग्निशन अॅप्लिकेशन्ससाठी संशोधन कार्य केले आहे.तसेच त्यांनी MIT World Peace University येथे प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून कार्य करताना मटेरियल सिंथेसिस आणि विविध कॅरेक्टरायझेशन तंत्रज्ञानामध्ये प्रत्यक्ष संशोधनाचा अनुभव मिळवला. या कालावधीत त्यांनी आपले मार्गदर्शक डॉ.सुधीरकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक भारतीय पेटंट प्रकाशित केले.तसेच प्रतिष्ठित RSC Applied Polymers या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकामध्ये संशोधन लेख प्रकाशित केला. ही उपलब्धी त्यांच्या संशोधनक्षमता आणि वैज्ञानिक योगदानाचे द्योतक मानली जात आहे.Ph.D. प्रवेश प्रक्रियेसाठी एकूण २८५ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी काही निवडक उमेदवारांना मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. अत्यंत स्पर्धात्मक प्रक्रियेतून कृष्णा शिंदे यांनी यश मिळवत अंतिम निवड प्राप्त केली. मुलाखतीदरम्यान त्यांनी आपल्या शैक्षणिक वाटचालीबरोबरच संशोधन अनुभव, फंक्शनल पॉलिमर्स, मॉलिक्युलरली इम्प्रिंटेड पॉलिमर्स आणि प्रयोगशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रभावीपणे सादर केला. तसेच LUT University मधील संशोधन वातावरणात योगदान देण्याची आपली तयारी आणि संशोधनाविषयीची दृष्टी त्यांनी स्पष्ट केली.विशेष म्हणजे, त्यांची LUT University मध्ये Junior Researcher म्हणूनही नियुक्ती झाली असून, त्यांना दरमहा सुमारे ₹२.८ ते ₹३ लाख इतके मानधन मिळणार आहे. ही उपलब्धी त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन कौशल्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्षमतेची साक्ष देणारी आहे.
२८५ अर्जदारांमधून अंतिम निवड होणे हा त्यांच्या शैक्षणिक आणि संशोधन प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून, ही उपलब्धी महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे.कृष्णा शिंदे हे दिनांक ११ मे २०२६ रोजी पुढील शिक्षणासाठी फिनलंडला रवाना होणार असून, तेथे LUT University मध्ये Ph.D. अभ्यासासोबत फंक्शनल मटेरियल्स आणि प्रगत संशोधन क्षेत्रात कार्य करणार आहेत. रसायनशास्त्राचा उपयोग करून पर्यावरणीय निरीक्षण, सेन्सर तंत्रज्ञान आणि प्रगत मटेरियल डिझाइन यांसारख्या क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण संशोधन करण्याची त्यांची विशेष इच्छा आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग आणि सर्व कर्मचारी यांनी कृष्णा शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.