न्यायालयीन

ॲट्राॅसिटीच्या केस मधुन तीन आरोपीची निर्दोष मुक्तता

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 5 ऑगस्ट : अहमदनगर जिल्हा तदर्थ न्यायाधीश श्री पी.पी. देशपांडे यांनी भादवि आणि अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये दाखल असलेल्या खटल्यातून तीन आरोपीचीं गुणदोषावर मुक्तता केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, गदेवाडी ता.शेवगाव जि अहमदनगर येथील महिला फिर्यादी समिंद्रा गुजर हिने शेवगाव पोलीस स्टेशन येथे काकासाहेब मारकंडे, गिताबाई मारकंडे आणि राजेंद्र नेव्हल सर्व रा. गदेवाडी ता.शेवगाव यांचे विरुद्ध भादवि आणि अनुसूचित जातीजमाती कायद्यानुसार जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून गुन्हा दाखल केला. सदर खटल्यात फिर्यादी हि चर्मकार समाजाची आहे तर आरोपी हे मराठा समाजातील आहेत अशी नोंद करण्यात आली आहे.सदर गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र डिवायएसपी सुदर्शन मुंढे यांनी अहमदनगर जिल्हा न्यायालय येथे दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी तदर्थ जिल्हा न्यायाधीश पी.पी.देशपांडे यांचे समोर झाली. फिर्यादीस तिची केस न्यायालयात पुराव्यासह सिध्द करता आली नाही. म्हणून सबळ पुरावा नसल्याने पुराव्या अभावी न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीचे वतीने फिर्यादीस फिर्याद दाखल करण्यास झालेला उशिर, जातीवाचक शिवीगाळ करताना पाहिलेला प्रत्यक्ष नसलेला साक्षीदार तसेच फिर्यादी व आरोपी यांचेतील पूर्वीचे वाद याबाबी न्यायालयात सिद्ध केल्या. दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकल्यानंतर फिर्यादीने दाखल केलेल्या खटल्यात भक्कम पुरावा कोर्टात आला नाही हे सिद्ध झाले म्हणून न्यायालयाने काकासाहेब मारकंडे, गिताबाई मारकंडे आणि राजेंद्र नेव्हल यांची निर्दोष मुक्तता केली.
आरोपीचे वतीने ॲड शिवाजी अण्णा कराळे, ॲड करुणा शिंदे, ॲड सत्यजीत कराळे यांनी कामकाज पाहिले. त्यांना ॲड मोनाली कराळे, ॲड दिप्ती शिंदे, ॲड समिक्षा उनवणे आणि ॲड विजय शिंदे यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे