देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : पारनेर, दि 6 ऑगस्ट
केंद्र शासनाने VIP कल्चर संपवण्यासाठी सन २०१७ मध्ये केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम १९(३) मध्ये सुधारणा करून शासकीय वाहनांवरील लाल आणि निळे दिवे पूर्णपणे बंद केले आहेत. हा अधिकार फक्त रुग्णवाहिका, अग्निशमन आणि पोलीस यांनाच आहे.मात्र असे असताना देखील पारनेर तहसीलदार यांच्या शासकीय वाहन क्रमांक MH16 DG 8719 वर नियमबाह्य लाल दिवा वापरण्यात येत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेर तालुका अध्यक्ष अविनाश मुरलीधर पवार यांनी केला आहे.याबत श्री. पवार यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, अहिल्यानगर येथे तक्रार दाखल केली होती. त्यावर RTO ने पत्र क्र. प्रापका/ख.वि/अहिल्यानगर/२०२६/जा.क्र.१९४६ दि.२८/०७/२०२६ अन्वये उत्तर दिले की, _”मोटार वाहन निरीक्षकांनी तपासणी केली असता सदर वाहनावर काळ्या काचा आढळून आल्या नाहीत”_.परंतु श्री. पवार यांच्याकडे सदर वाहन नियमबाह्य लाल दिवा वापरत असतानाचे स्पष्ट फोटो/व्हिडिओ पुरावे आहेत.त्यामुळे नियुक्त अधिकाऱ्यांनी खोटी माहिती देऊन शासनाची आणि MNS ची दिशाभूल केली आहे* असा आरोप करत, श्री. पवार यांनी आज प्रादेशिक परिवहन अधीक्षक, विभागीय आयुक्त, महसूल मंत्री आणि जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार दिली आहे.
MNS ची मागणी:
1. पारनेर तहसीलदार आणि संबंधित मोटार वाहन निरीक्षक यांच्यावर त्वरित शिस्तभंगाची व कायदेशीर कार्यवाही करावी.
2. नियमबाह्य वाहनावर तात्काळ दंडात्मक कारवाई करावी.
3. ७ दिवसात कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पारनेर तीव्र आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला आहे.
“कायद्याचे रक्षकच जर कायदा मोडत असतील तर सामान्य जनतेने कुणाकडे पहायचे?” असा सवाल करत श्री. पवार यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
🚨 लाल दिव्याचा भ्रष्टाचार उघड!🚨
२०१७ पासून बंद असलेला लाल दिवा पारनेर तहसीलदार वापरतात!
RTO ने खोटी माहिती देऊन बचाव केला.
MNS चे तालुका अध्यक्ष अविनाश पवार यांचा पुराव्यासह पर्दाफाश
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा