न्यायालयीन

फॅमिली कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. शिवाजी अण्णा कराळे, तर उपाध्यक्षपदी ॲड. अनिता दिघे,सचिवपदी ॲड. शिवाजी सांगळे यांची बिनविरोध निवड

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि 14 जून – सुमारे २०० वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेल्या शहरातील जुन्या न्यायालयात असलेल्या कौटुंबिक न्यायालयातील वकिलांच्या फॅमिली कोर्ट ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड शिवाजी अण्णा कराळे यांची तर उपाध्यक्षपदी ॲड.अनिता दिघे, कार्याध्यक्षपदी ॲड.लक्ष्मण कचरे, सचिवपदी ॲड.शिवाजी सांगळे, खजिनदारपदी ॲड.बाबाजी सांगळे व महिला सचिवपदी ॲड पल्लवी दातीर यांच्यासह कार्यकारणी सदस्यांची बिनविरोध निवड झाली. असोसिएशनचे मावळते अध्यक्ष ॲड. लक्ष्मण कचरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या असोसिएशनच्या बैठकीत सर्वानुमते नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. २०२६ ते २८ या दोन वर्षांसाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
या बैठकीमध्ये असोसिएशनच्या कार्यकारिणी सदस्यपदी जेष्ठ विधिज्ञ ॲड.सुरेश लगड, ॲड.मच्छिंद्र आंबेकर, ॲड.कल्याण पागर, ॲड.पोपट म्हस्के, ॲड.मनीषा केळगंद्रे-शिंदे, ॲड.राजेश कावरे व ॲड.कु.किरण जाधव आदींच्याही सर्वानुमते नियुक्त्या करण्यात आल्या. या बैठकीत अध्यक्ष पदासाठी शिवाजी कराळे यांच्या नावाची सूचना सुरेश लगड यांनी मांडली त्यास राजेश कावरे यांनी अनुमोदन दिले.
फॅमिली कोर्ट बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष ॲड.शिवाजी अण्णा कराळे हे गेल्या ३१ वर्षांपासून वकील क्षेत्रात कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी २०१३ ते १४ या काळात अहमदनगर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. तसेच २०२२ साली ते कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्षही होते. आता दुसऱ्यांदा या पदाची जबाबदारी ॲड.कराळे यांना मिळाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड कल्याण पागर यांनी कामकाज पाहिले.
यावेळी ॲड.शिवाजी कराळे म्हणाले, जुन्या न्यायालयाला २०० वर्ष पूर्ण झाले आहेत. अशा मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या न्यायालयातील फॅमिली कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळणे हे माझे मोठे भाग्य आहे. अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा माझ्यावर टाकून सर्व सदस्यांनी मोठा विश्वास व्यक्त केला आहे. या पदाच्या माध्यमातून वकिलांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याबरोबरच बार व बेंच मध्ये सकारात्मक वातावरण ठेवण्यास प्राधान्य देऊ. तसेच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण असे विविध क्षेत्रातील उपक्रम राबवण्यावर भर देणार आहे. सर्व वकील बंधुभगिनींना बरोबर कामकाज करणार आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे