देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 14 जून : बिदर समितीचा अहवाल सरकारने मंजूर केलेला नाही. त्यामुळे अनुसूचित जाती वर्गीकरण होणार नाही. असे मत राज्याचे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केले. अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहावर हे माध्यमांशी बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले लोकशाहीमध्ये सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे. वर्गीकरण हा विषय किचकट करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वीही मी सांगितलं होतं की उपवर्गीकरण होणार नाही. आमदार रोहित पवार यांच्या उपोषणावर टीका करताना ते म्हणाले शेतकऱ्यांच्या अश्रू आम्हाला माहित आहेत. उपोषणाचे नाटक करणाऱ्यांना शेतकरी कधी कधीच तारा देणार नाहीत.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा