राजकिय

पंतप्रधान मोदींच्या निर्णय प्रक्रीयेतून शेवटच्या घटकाला संधी-ना.विखे पाटील वाढदिवसा निमित्त दिव्यांग बांधवांना साधन साहीत्याचे वाटप

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. १८ सप्टेंबर प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा उपक्रमांतर्गत पद्मश्री डॉ विखे पाटील फौंडेशन आणि दिव्यांग विभाग बांधवांना विविध साधन साहीत्यांचे वितरण करून आशीवार्दाचा सेवा दिप प्रज्वलित केला.जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जेष्ठ नागरीकांना साहीत्याचे वितरण करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस तसचे त्यांच्या सार्वजनिक वाटचालीला २५वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण देशात सेवा उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.अहील्यानगर येथे जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनात आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन आणि दिव्यांग विभागाच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना साधन साहीत्याचे वितरण करण्यात आले.याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग उपमहापौर धनंजय जाधव विनायक देशमुख जेष्ठ नेते वसंतराव कापरे,नगरसेवक निखिल वारे डॉ विखे पाटील फौंडेशनचे डॉ अभिजीत दिवटे डॉ पांडूरंग गायकवाड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
समाजातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.या कार्यक्रमात दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार साधन साहीत्याचे वितरण करण्यात आले.यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सार्वजनिक जीवनातील संपूर्ण वाटचाल जनतेसाठी समर्पित केली.सुशासन गरीब कल्याण आणि राष्ट्र निर्माण या भूमिकेतून सबका साथ सबका विकास आणि सबका कल्याण या विचाराने देशातील प्रत्येक नागरीकाला योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करीत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
दिव्यांग व्यक्तींना केवळ सहानुभूती नव्हे तर संधी, सुविधा आणि स्वावलंबनासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करीता पद्मश्री डॉ विखे पाटील फौंडेशनने नेहमीच पुढाकार घेतल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन संपूर्ण महीनाभर करण्यात येणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे