देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : आहिल्यानगर दि. 19 सप्टेंबर : मा.पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने श्री.संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोउपनि/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, प्रताप देवकाते, मनोज साखरे, अमोल कोतकर अशांचे पथक तयार करून जिल्हयातील अवैध धंदयाची माहिती काढुन, कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.
दिनांक 18/09/2026 रोजी पथक तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की, इसम नामे किरण संतोष गलांडे, रा.दक्षतानगर, तपोवन रोड, अहिल्यानगर हा त्याचे मालकीचे गाळयाचे पाठीमागील मोकळया जागेत घरगुती वापराच्या गॅस टाक्यामधुन कमर्शियल गॅस टाक्यामध्ये रिफीलिंग करण्यासाठी ठेवल्या असून तो विना परवाना चोरून गॅसची विक्री करत आहे.मिळालेल्या माहितीवरून पथकाने पंचासमक्ष नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथे दोन इसम हे घरगुती गॅस टाक्यास इलेक्ट्रीक मोटार जोडून वजन काटयावर ठेवली असताना मिळून आले.त्यांचेकडे घरगुती व कमर्शियल गॅस टाक्या वापर व परवाण्याबाबत विचारपूस करता त्यांनी परवाना नसल्याचे सांगीतले.पथकाने छापा टाकुन 1) कल्ला रघुराज सिंग, वय 24, रा.गजानन कॉलनी, एमआयडीसी, बोल्हेगाव, ता.अहिल्यानगर 2) गौरव राजेंद्र आढाव, वय 34, रा.आढाववाडी, पिंपळगाव माळवी, ता.अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीकडे व्यवसायाच्या मालकीबाबत विचारपूस करता त्यांनी सदरचा व्यवसाय हा 3) किरण संतोष गलांडे, रा.दक्षतानगर, तपोवन रोड, अहिल्यानगर (फरार) याचे मालकीचे असून रिफीलींग करण्यासाठी लागणाऱ्या घरगुती गॅस टाक्या या 4) नितीन कदम पुर्ण नाव माहित नाही, रा.पाईपलाईन रोड, अहिल्यानगर (फरार) याचेकडून खरेदी केल्या असल्याची माहिती सांगीतली.
पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपीचे कब्जातून 21,80,000/- रूपये किंमती त्यात भारत गॅस कंपनीच्या 56 घरगुती, 46 कमर्शियल गॅस टाक्या भरलेल्या व 2 घरगुती गॅस टाक्या रिकाम्या, एचपी गॅस कंपनीच्या 23 घरगुती, 3 कमर्शियल गॅस टाक्या भरलेल्या व 3 कमर्शियल गॅस टाक्या रिकाम्या, 2 इलेक्ट्रीक मशीन, 2 इलेक्ट्रीक वजन काटे, 4 छोटा हत्ती वाहन, 1 बोलेरो पिकअप, 1 ओमिनी कार, 1 गॅस टाकीस सील बसविण्यासाठी हिट गन मशीन व 30 गॅस टोपण, प्लास्टीक लेबल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह तोफखाना पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असून, वर नमूद आरोपीविरूध्द तोफखाना पोलीस स्टेशन गुरनं 799/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 125, 287, 288, 318 (4), 336, 3 (5) सह जिवनावश्यक वस्तु अधिनियम 1995 चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
वरील कारवाई मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा