देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 20 सप्टेंबर :मा.श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध वाळु वाहतुकी विरुध्द कारवाई करणेबाबत आदेशित केले आहे. त्यानुषंगाने श्री.संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोलीस अंमलदार अरूण गांगुर्डे, रणजीत जाधव, अमोल कोतकर, सतीष भवर अशांचे पथक तयार करून अवैध वाळु वाहतुक करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.
दिनांक 20/09/2026 रोजी पथक पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध वाळु वाहतुक करणाऱ्यांची माहिती काढत असताना गोपनीय माहिती मिळाली की, इसम नामे नारायण बोरूडे, रा.पाथर्डी हा बोरूडे मळा, पाथर्डी येथे जेसीबीच्या सहाय्याने डंपरमध्ये वाळु भरून वाहतुक करणार आहे.मिळालेल्या माहितीवरून पथकाने पंचासमक्ष बोरूडे मळा, पाथर्डी येथे जाऊन खात्री केली असता एका जेसीबीचे सहाय्याने ढंपरमध्ये वाळु भरताना दिसून आला.पथकाने छापा टाकुन जेसीबी चालक 1) उमेश विष्णु कचरे, वय 22, रा.पाडळी, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेतले.त्याचेकडे वाळु वाहतुकीचे परवान्याबाबत विचारपूस केली असता त्याने वाळु वाहतुकीचा कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगून जेसीबी व ढंपरचा मालक 2) नारायण बोरूडे पुर्ण नाव माहित नाही, रा.बोरूडे मळा, ता.पाथर्डी (फरार) याचे सांगणेवरून वाळुची वाहतुक करत असल्याची माहिती सांगीतली.
ताब्यातील आरोपीचे कब्जातून 25,00,000/- रू किं.त्यात एक जेसीबी क्रमांक एमएच-16-सीव्ही-7624 व 15,00,000/- रू किं.त्यात एक टाटा कंपनीचा विनाक्रमांका ढंपर, 40,000/- रू किंमतीची वाळु असा एकुण 40,40,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.वर नमूद आरोपीविरूध्द पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 1151/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2), 3(5) सह पर्यावरण कायदा कलम 3 ,15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.
वरील कारवाई ही मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा