सामाजिक

अनुसूचित जातीचे आमदार उपवर्गीकरणाच्या विरोधात बोलत नाहीत तोंड बंद करून बसले आहेत : सिद्धार्थ शिनगारे “वादळ वाऱ्यात अंन उन्हातानात जय भीमवाले उतरले मैदानात!” अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात निघालेल्या लॉंगमार्च चे नगरमध्ये जंगी स्वागत

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 16 जून : अनुसूचित जातीमध्ये अ,ब, क, ड याप्रमाणे राज्य सरकारने आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा प्रयत्न चालू केलेला आहे. या उपवर्गीकरणाच्या विरोधात बीड ते मुंबई मंत्रालय अशा लॉंग मार्च “वादळ वाऱ्यात अंन उन्हातानात जय भीमवाले उतरले मैदानात!” या प्रेरणा गीतासह अहिल्यानगर शहरात दाखल झाला. यावेळी शहरातील चांदणी चौक येथे या लॉंग मार्चचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर मार्केट यार्ड जवळील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर येथील सीताबन लॉन्स येथे आयोजित जाहीर सभेत बोलतांना
लॉन्ग मार्च चे संयोजक सिद्धार्थ शिनगारे म्हणाले विधानसभेमध्ये अनुसूचित जातीचे एकूण 29 आमदार आहेत, 29 आमदारांपैकी राजकुमार बडोले व नितीन राऊत हे दोनच आमदार अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात भूमिका मांडत आहेत. बाकीचे 27 आमदार उपवर्गीकरणाच्या विरोधात काही नाहीत तोंड बंद करून बसले आहेत, ही खूप मोठी शोकांतिका आहे. पावसाळी अधिवेशनात यावर निर्णय व्हावा यासाठी हा लॉन्ग मार्च काढलेला आहे असे ते म्हणाले . यावेळी ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड, स्वागत अध्यक्ष महानगरपालिकेचे नगरसेवक सुरेश बनसोडे, सुरेंद्रभाऊ थोरात, अजय सरोदे,भीमराव बागुल, एन. एम.पवळे,प्रा. निवृत्ती आरू, प्रा. विलास साठे, सुमेध गायकवाड,डॉ. करण गाडे,सिद्धार्थ आढाव,रवींद्र कांबळे, जीवन कांबळे,संतोष मोकळ, चर्मकार महासंघाचे संजय खामकर,शिवाजी साळवे यांनी आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात मते मांडली. यावेळी प्रा. जयंत गायकवाड, प्रा. हनुमंत गायकवाड, प्रा. एल.बी. जाधव, पत्रकार महेश भोसले, अमित काळे,राजेंद्र उबाळे,कॉम्रेड मेहबूब सय्यद, कामगार नेते प्रवीण सोनवणे, माजी नगरसेवक बाळासाहेब गायकवाड, दीपक अमृत, सुजित घंगाळे, विवेक विधाते, कौशल गायकवाड,सृजन भिंगारदिवे,सुरेश भिंगारदिवे, बाजीराव भिंगारदिवे, श्रेयश भिंगारदिवे, विशाल भिंगारदिवे, समीर भिंगारदिवे, प्रतीक सोनवणे, सिद्धांत गायकवाड, शांतवन साळवे,दया गजभिये, शनेश्वर पवार, गौतमी भिंगारदिवे, जयश्री गायकवाड, मालती लक्ष्मण जाधव, गणेश गायकवाड, संघा गायकवाड, जय कदम, ऋषी विधाते, निखिल सूर्यवंशी सुशील कदम, अजय पाखरे, आदींसह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील सीताबन लॉन्स येथे आयोजित उपवर्गीकरण विरोधात सभेत लॉंग मार्च चे संयोजक सिद्धार्थ शिनगारे बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले 26 जून या दिवशी आरक्षणाचे जनक शाहू महाराजांची जयंती असल्यामुळे याच दिवशी मुंबई मंत्रालय येथे हा लॉन्ग मार्च धडकणार आहे. या दिवशी मुंबईमध्ये चार ते पाच लाख भीमसैनिक येतील असा पोलीस प्रशासनाचा अहवाल आहे. हे उपवर्गीकरण महाराष्ट्रातच का? का नाही इतर राज्यात का नाही असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार सांगितले की तुम्ही हे उपवर्गीकरण करू शकता, कराच सक्ती केलेली नाही. सुप्रीम कोर्टाचा बाप भारतीय संविधान आहे. सुप्रीम कोर्टाला संविधानाने बनवले आहे. आम्ही फायदा तोटा पाहून विरोध करत नाहीत. जे बाबासाहेबांच्या विरोधात आहेत, जे संविधानाच्या विरोधात आहेत. त्यांच्या विरोधात आम्ही आहोत. या सभेचे प्रास्ताविक प्राध्यापक निवृत्ती आरू यांनी केले. सूत्रसंचालन सिद्धार्थ आढाव यांनी केले. सभेनंतर उपस्थित सर्व कार्यकर्त्यांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था स्वागताध्यक्ष महापालिकेचे नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे यांनी केली. त्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे आभार मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे