गुन्हेगारी
दहशत निर्माण करणारा 03 महिन्यापासुन फरार असलेला आरोपी घोडेगांव येथुन जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 24 जुलै : प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 15/04/2026 रोजी रात्रीचे 01/24 वा.चे सुमारास आरोपी 1) शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख, 2) बबलु जयसिंग लोंढे, 3) राकेश विशाल आल्हाट, 4) करण उर्फ बुट्या भांडालकर, 5) विक्रम उर्फ बाबा सुधाकर आंग्रे, 6) बालु तेलधुने, सर्व रा. घोडेगाव, ता.नेवासा यांनी झापवाडी रोडने येवुन फिर्यादी यांचेवर दहशत व जरब बसावी या उद्देशाने फिर्यादीच्या घराच्या कंपाऊंडच्या बाहेरुन रोडवरुन ज्वलनशील पेट्रोल पदार्थ टाकुन काडीच्या पेटीच्या सहाय्याने पेटवुन, फिर्यादीचे मोटार सायकल व जनाव-यांच्या चा-याचे नुकसान केलेले आहे. सदर घटनेबाबत फिर्यादी सचिन साहेबा फुलमाळी, रा. घोडेगाव, ता.नेवासा, जि. अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सोनई पोलीस स्टेशन गु.र.नं. 137/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 324(5), 324(6), प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्याचे तपासामध्ये गुन्ह्यास भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 111 प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आलेले आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी नामे 1) बबलु जयसिंग लोंढे, 2) विक्रम उर्फ बाबा सुधाकर आंग्रे, दोघे रा. घोडेगाव, ता.नेवासा जि. अहिल्यानगर, 3) राकेश विशाल आल्हाट, वय-23 वर्षे रा. घोडेश्वरी मंदिराजवळ घोडेगाव, ता.नेवासा 2) मयुर उर्फ बालु रविंद्र तेलधुने, वय-21 वर्षे, रा. सदर यांना यापुर्वी सदर गुन्ह्याचे तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेकडुन अटक करण्यात आलेली आहे.
गुन्ह्यातील उर्वरीत पाहिजे आरोपीचा शोध घेणे कामी पो.नि. श्री संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/ संदिप दरवडे, पोलीस अंमलदार फुरकान शेख, विष्णु भागवत, राहुल डोके, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब खेडकर, चालक प्रदीप शेळके यांचे पथक तयार करुन रवाना केले.
वर नमुद पथकाने वरील गुन्ह्यातील पाहिजे आरोपींची माहिती संकलित करुन, व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती काढत असतांना पथकास दिनांक 23/07/2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हा मोरे चिंचोरा, ता नेवासा गावामध्ये मिळुन आल्याने, त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचंे नांव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नावे 1) शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख, वय 28 वर्षे, रा. घोडेगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे सदर गुन्ह्याचे अनुषंगाने विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदारासह केला असल्याचे सांगितले आहे.
ताब्यातील आरोपी वरील गुन्ह्याचे तपासकामी सोनई पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.



